Mormugao Municipal Corporation dainikgomantak
गोवा

वास्को : मुरगाव नगरपालिका कर्मचारी जाणार बेमुदत संपावर

दैनिक गोमन्तक

वास्को : सोमवारपर्यंत वेतन न मिळाल्यास बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय कर्मचारी वर्गाने घेतला आहे. त्यामुळे पालिका अधिकारी या संबंधी काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच कर्मचारी वर्ग देखील काय भूमिका घेणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. कारण कर्मचारी वर्ग संपावर गेल्यास नागरिकांची गैरसोय होणार आहे. मुरगाव नगरपालिका गोव्यात "अ" दर्जाची पालिका असल्याची गणना होत असली तरी प्रत्यक्षात पालिका तिजोरीत मात्र गेली कित्येक वर्षे खडखडाट निर्माण झाला आहे.

मुरगाव पालिका क्षेत्रात सर्व प्रकारचे दळणवळण आहे. यात विमानतळ (Airport), मुरगाव पोर्ट (Mormugao Port), इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (Indian Oil Corporation) कंपनी, कोळसा (Coal) कंपन्या, रेल्वे (Railway), झूवारी अॅग्रो कंपनी असे मोठ मोठे उद्योग या ठिकाणी आहेत. वास्को शहर हे एक प्रकारे गोव्याची दुसरी राजधानी म्हटली तर वावगे ठरणार नाही. या सगळ्या कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात महसूल पालिकेला येणे क्रमप्राप्त आहे.

(Mormugao Municipal Corporation employees will go on indefinite strike)

मात्र पालिकेचे घोडे कोठे अडतात हे त्यांनाच ठाऊक आहे. या कंपन्यांकडून महसूल (Revenue) गोळा करण्यास पालिका का धजावते? हा मोठा प्रश्न आहे. कंपन्याकडून करोडो रुपयांची थकबाकी पालिकेला येणे आहे. मात्र त्या कंपन्याकडून थकबाकी रीतसर वसूल होत नसल्याने पालिकेला मोठ्या आर्थिक परिस्थितीला सामोरे जावे लागते. त्याच बरोबर शहरातील आस्थापने, दुकाने तसेच भाजी मार्केट, मासळी मार्केट मधील सोपो कलेक्शन शंभर टक्के गोळा होत नसल्याची सूत्रांकडन माहिती प्राप्त झाली आहे.

पालिकेची थकबाकी वसुली होत नसल्याने याचा परिणाम घाण काढण्याचे काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यावर होत आहे. त्यांचे वेतन वेळेवर होत नसल्याने याचा सहन करावा लागतो. याला जबाबदार मुख्याधिकारी की नगराध्यक्ष हाच प्रश्‍न भेडसावत आहे. दोन्ही अधिकारी फक्त आश्वासनांच्या फैऱ्या उडवत असल्याचे बोलले जाते. प्रत्यक्षात तारीख पे तारीख देऊन दिवस ढकलत आहे.

मुरगाव पालिकेच्या कर्मचारी वर्गाला जानेवारी व फेब्रुवारी असे दोन महिन्यांचे वेतन अद्याप न मिळाल्याने त्यांच्यामध्ये नाराजी पसरली आहे. बुधवारी वेतन मिळेल, अशी कर्मचाऱ्यांना आशा वाटत होती. कर्मचाऱ्यांना वेतन मिळावे, यासाठी पालिका कर्मचारी संघटनेनेही यात लक्ष घातले नाही. मुख्याधिकारी जयंत तारी, नगराध्यक्ष दामोदर कासकर यांनीही वेतन लवकरच मिळेल असे सांगतात. पण प्रत्यक्षात तसे होत नाही.

पालिकेच्या उत्पन्नाचेकाही दरवाजे बंद झाल्याने तिजोरीत खळखळाट आहे. महसूल वाढीसाठी अधिकारी, पालिका मंडळ यापैकी कोणीच प्रयत्न करत नसल्याचा दावा करण्यात येत आहे. पालिकेला वेतनापायी सुमारे एक कोटी वीस लाख रुपयांची गरज प्रत्येक महिन्यामध्ये भासते. सध्या पालिकेकडे राखीव निधीच नाही. त्यामुळे थकबाकी गोळा करा आणि वेतन देण्याएवढी रक्कम जमा झाली की कामगारांचे वेतन द्या,अशी परिस्थिती मुरगाव पालिकेवर (Mormugao Municipal Corporation) आली आहे.

दरम्यान गेल्या दोन महिन्याचे वेतन आजपर्यंत पालिका कर्मचाऱ्यांचे खात्यात जमा झाले नाही. पालिका संघटनेचे अध्यक्ष केशव प्रभू कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यास असमर्थ ठरले आहे. गेल्या वर्षी डिसेंबर २२ तारीखला कर्मचाऱ्यांच्या खात्यात वेतन जमा झाले होते. मात्र त्यानंतर आजपर्यंत दोन महिन्याचे वेतन खात्यात जमा झाले नाही. याविषयी संघटनेचे अध्यक्ष केशव प्रभू यांनी लक्ष घातले नसल्याने कर्मचारी वर्ग हवालदिल झाला आहे. वेतनाचा (salary) प्रश्न ऐरणीवर आला असला तरी संघटनेचे अध्यक्ष केशव प्रभू त्यांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यास असमर्थ ठरल्याने कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

दरम्यान आज सकाळी अखिल गोवा पालिका संघटनेचे सचिव अनिल शिरोडकर यांनी मुरगाव पालिका कर्मचाऱ्यांची भेट घेऊन त्यांचे गा-हाणे ऐकले व नंतर पालिका मुख्याधिकारी जयंत तारी व नगराध्यक्ष दामोदर कासकर यांची भेट घेऊन कर्मचाऱ्यांच्या वेतन विषयी विचार विनिमय करण्यात आला. मात्र यावेळी त्यांना पुन्हा एकदा तारीख देण्यात आली. जर सोमवारी कर्मचाऱ्यांचे वेतन खात्यात जमा झाले नाही तर पालिकेला कायदेशीर नोटीस बजावून संपावर जाण्याचा इशारा यावेळी संघटनेचे सचिव अनिल शिरोडकर यांनी दिला आहे.

मुरगाव पालिका (Mormugao Municipal Corporation) कर्मचाऱ्यांचा वेतनाचा प्रश्न हा नित्याचा झाला असून हे काही नवीन नाही. कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न सोडविण्यास पालिका असमर्थ ठरली आहे. आज झालेल्या बैठकीत सोमवारची तारीख दिली असून जर वेतन कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा झाले नाही तर कर्मचारी संपावर जाणार असल्याचे ते म्हणाले. तसेच पालिकेला येणारा ऑक्टोय गेली पाच वर्षे बंद असून तो पूर्ववत सुरू केल्यास पालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न सुटण्यास मदत होणार असल्याचे ते म्हणाले. नगराध्यक्ष दामोदर यांनी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा (salary) प्रश्न सोमवार पर्यंत सोडवण्यात येईल असे सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'गुंतवणूकदारांनी मोठ्या संख्‍येने गोव्‍यात यावे'; गुजरातमधील परिषदेत मुख्‍यमंत्री सावंतांचे आवाहन

Cutbona Jetty: कुटबण- मोबोर येथे आणखी ४ कॉलराबाधित सापडले! 'संख्‍या १८७' वर

St Estevam Accident: बाशुदेव कडे होते रोख '१ लाख' रुपये? २३ सप्टेंबरनंतरच ‘ती’ जबाब द्यायला गोव्यात येणार

Goa Cabinet Reshuffle: पक्षश्रेष्ठी महाराष्ट्राच्या निवडणुकीत गर्क; गोवा मंत्रिमंडळाची पुनर्रचना पुन्हा लांबणीवर

Goa Accidents: गोव्यात अपघातांचे सत्र सुरूच! आणखी तीन बळी; मांद्रेतील तिसऱ्या तरुणीचाही मृत्यू

SCROLL FOR NEXT