Goa Dainik Gomantak
गोवा

Goa News: ‘बिहारमध्ये गोव्यापेक्षाही येतात अधिक पर्यटक’- तेजस्वी यादव

गोवा हे जागतिक स्तरावरील पर्यटनस्थळ आहे आणि ते छोटे राज्य असूनही पर्यटकांचे आकर्षण ठरले आहे

गोमन्तक डिजिटल टीम

बिहारमध्ये पर्यटनाला भरपूर वाव आहे आणि बिहारमध्ये गोव्यापेक्षाही अधिक पर्यटक येतात, असा दावा बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी केला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे गोवा हे जागतिक स्तरावरील पर्यटनस्थळ आहे आणि ते छोटे राज्य असूनही पर्यटकांचे आकर्षण ठरले आहे. बिहारचे क्षेत्रफळ गोव्याच्या तुलनेत अधिक आहे, हे यादव यांना माहीत असावे.

खरेतर बिहारची तुलना गोव्यापेक्षा इतर मोठ्या राज्यांशी त्यांनी करणे अपेक्षित होते. यादव यांचे म्हणणे आहे की, दक्षिण आशियाई बौद्ध देशांतून बरेच लोक बिहारला भेट देतात आणि लोक ‘पिंड दान' करण्यासाठी राज्यात येतात. बिहारमध्ये युनेस्कोने जाहीर केलेली वारसास्थळे आहेत. त्यात बोधगया व नालंदा अवशेष ही स्थळे आहेत.

गोव्यात 2019 पूर्वी म्हणजेच कोविडपूर्वी 81 लाख पर्यटकांनी हजेरी लावली होती. त्याशिवाय राज्यातील काही सरोवरांवर गोवा व चेन्नईसारख्या सुविधा निर्माण करण्याची बिहार सरकारची योजना आहे. त्यात जलक्रिडांचाही समावेश आहे.

गोव्यात आंतरराष्ट्रीय पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात, त्याउलट स्थिती बिहारमध्ये आहे. त्याठिकाणी आशियाई देशातून पर्यटक येतात. लहान राज्य असले तरी ते बिहारच्या तुलनेत कित्येकपटीने विकसीत आहे, याची तुलना यादव यांनी केलेली दिसत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT