Breast Cancer Dainik Gomantak
गोवा

Breast Cancer: एक लाखापेक्षाही अधिक महिलांची स्तनाच्या कर्करोगाची तपासणी; राज्यात ५८ महिलांना कर्करोगाची लागण

Breast Cancer Awareness: आत्तापर्यंत ‘स्वस्थ महिला, स्वस्थ गोवा’ या उपक्रमांर्गत १ लाख ११ हजार ९८० महिलांची स्तनाच्या कर्करोगासाठी तपासणी करण्यात आली यामध्ये ५८ महिलांना कर्करोगाची लागण झाली असल्याची माहिती मिळाली

गोमन्तक डिजिटल टीम

Breast Cancer Awareness, Goa

गोवा: आरोग्य खात्यातर्फे सुरु असलेल्या कर्करोग जागृती सप्ताहामध्ये कर्करोगाविषयी विविध स्थरांवर जागृती केली जातेय. या उपक्रमाचा भाग म्हणून ‘विजय उत्सव’ अंतर्गत स्तनाच्या कर्करोगाचा सामना करत त्यातून यशस्वीपणे बाहेर पडलेल्या महिलांचा सन्मान करण्यात आला आणि यावेळी राज्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी इतर सर्व महिलांना आरोग्य केंद्राला भेट देत मोफत तपासणी करण्याचे आवाहन केले.

आत्तापर्यंत ‘स्वस्थ महिला, स्वस्थ गोवा’ या उपक्रमांर्गत १ लाख ११ हजार ९८० महिलांची स्तनाच्या कर्करोगासाठी तपासणी करण्यात आलीये, यामध्ये २,२९४ महिला स्तनाच्या कर्करोगाच्या संशयित आढळल्या तर ५८ महिलांना कर्करोगाची लागण झाली असल्याची माहिती आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी दिली.

सध्या गोव्यात प्राथमिक तसेच कम्युनिटी आरोग्य केंद्रांमध्ये स्तनाच्या कर्करोगाची मोफत तपासणी केली जातेय. रोगाचे वेळेत निदान झाल्याने यावर उपचार करणं सोपं जातं, तसेच प्राथमिक टप्यात उपचार मिळाल्याने रुग्णाचा जीव वाचवायला मदत मिळते.

आयईबी उपकरण हे वेदनारहित आणि रेडिएशन मुक्त आहे आणि यामुळे चाचणीचे अहवाल देखील त्वरित मिळतात. राज्यात २०१९ पासून ‘स्वस्थ महिला, स्वस्थ गोवा’ या उपक्रमाला सुरुवात झाली आणि पहिल्या दोन वर्षांतच याअंतर्गत १ लाख महिलांची तपासणी करण्यात येणार होती.

या उपक्रमाचा कालावधी वाढवण्यात आला असून यामध्ये आता स्तनांच्या कर्करोगाच्या तपासणीसह, याबद्दल जागृती करणे, महिलांना शिक्षित करणे यांचाही समावेश करण्यात आलाय. कालावधी बरोबरच आता महिलांची संख्या देखील २.५ लाखांपर्यंत वाढवण्यात आली असून फेब्रुवारी महिन्यापासून महिलांना कर्करोगाची महाग औषधं देखील मोफत दिली जात आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa BJP: भाजप नेत्‍यांना पक्षशिस्‍त पाळण्याच्या सूचना! Cash For Job वर जाहीर वाच्‍यता नको; गाभा समितीच्या बैठकीत घमासान

Rashi Bhavishya 22 November 2024: व्यवसायात चांगला फायदा होईल, प्रेम प्रकरणात यश मिळेल; पण कोणाला?

Goa Governor: सबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशावरुन वक्तव्य; गोव्याचे राज्यपाल पिल्लई यांच्या विरोधातील FIR रद्द

Goa Exposition: सामाजिक सलोखा बिघडवण्याचा कट? PFI च्या चार सदस्यांची कसून चौकशी

Goa Crime: नोएडाच्या महिलेला मारहाण करुन विनयभंग; तामिळनाडूच्या आरोपीला दोन वर्षे कारावासाची शिक्षा

SCROLL FOR NEXT