CCTV cameras are off in Goa Dainik Gomantak
गोवा

गोव्याची सुरक्षा ऐरणीवर, निम्म्याहून अधिक सीसीटीव्ही बंद

गोव्यात सीसीटीव्ही कॅमेऱ्या बाबत उदासीन स्थिती

दैनिक गोमन्तक

मडगाव : गोव्यात सरकारने कित्येक मोक्याच्या ठिकाणी लोकांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले असले तरी त्यातील निम्म्याहून अधिक कॅमेरे बंद अवस्थेतच आहेत अशी माहिती खुद्द पोलीस (police) महासंचालक इंद्रदेव शुक्ला यांनी दिली.

आज त्यांच्या हस्ते वेर्णा औद्योगिक वसाहती जवळ हमरस्त्यावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. शुक्ला यांनी त्यांचे आज उद्घाटन केले. यावेळी बोलताना ते म्हणाले, गोव्यात सीसीटीव्ही कॅमेऱ्या बाबत थोडीशी उदासीन स्थिती आहे. सरकारतर्फे (Government) मोक्याच्या अशा 350 ठिकाणी असे कॅमेरे बसविण्यात आले आहेत पण त्यांच्या पुरेशा देखभाली अभावी ते बंद अवस्थेतच आहेत.

वेर्णा औद्योगिक वसाहत उद्योजक संघटने तर्फे हमरस्त्यावर 54 कॅमेरे स्वखर्चाने बसवले आहेत. शुक्ला यानी या उपक्रमाचे स्वागत करताना आता खासगी आस्थापनेनीही अशी सुरक्षा यंत्रणा उभारण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले.

हमरस्त्यावर असलेल्या कित्येक घरात अशी सीसीटीव्ही कॅमेरा यंत्रणा बसवली आहे. मात्र घराबाहेर ते बसवले नाहीत. अशा घरमलकांनी आपल्या घराबाहेरही एक कॅमेरा बसवावा. त्यामुळे जर त्या परिसरात चोरी सारखे प्रकार झाले. आणि लावलेल्या कॅमेऱ्यावर त्या चोरट्यांची छबी दिसली तर तो चोरटा पकडू जाऊ शकेल. अशाने गुन्हेगारीवरही नियंत्रण येण्यास मदत होईल असे मत शुक्ला यांनी व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT