Goa Police arrested Maharashtra youth Dainik Gomantak
गोवा

Goa Police: परदेशात नोकरीच्या आमिषाने गोव्यातील 100 हून अधिक युवकांची फसवणूक; 13 लाखांना लुबाडले

संशयित महाराष्ट्राच्या युवकाला ओल्ड गोवा पोलिसांनी केली अटक

Akshay Nirmale

Old Goa Police Arrested youth from Ahmednagar: परदेशात चांगली नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून महाराष्ट्रातील एका युवकाने गोव्यातील शंभरहून अधिक युवकांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे.

या संशयित युवकास ओल्ड गोवा पोलिसांनी अटक केली आहे.

अनिकेत गायकवाड असे त्याचे नाव आहे. तो मूळचा महाराष्ट्रातील अहमदनगरचा आहे. परदेशात चांगली नोकरी लावण्याच्या उद्देशाने त्याने गोव्यातील युवकांकडून पैसे घेतले होते. त्याच्या या आमिषाला गोव्यातील शंभरहून अधिक युवक बळी पडले होते.

या युवकांची गायकवाड याने सुमारे 13 लाख रूपयांची फसवणूक केली होती.

लॉरीन सिक्वेरा यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गायकवाड याला मुंबईतून अटक केली. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

गायकवाड याने आणखी कुणाची फसवणूक केली आहे का, या पाठीमागे तो एकटा आहे की कुठली टोळी सक्रीय आहे, याची चौकशी सध्या पोलिस कत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lessons from Animals: प्राण्यांकडूनही शिकता येतात जीवनाचे धडे! मुंग्यांची शिस्त, पक्ष्यांची मेहनत अन् निसर्गाची जादू

Bangladesh Resort Fire: बांगलादेशात रिसॉर्टला भीषण आग, 10 जणांचा होरपळून मृत्यू; जीव वाचवण्याची संधीच मिळाली नाही VIDEO

Trigrahi Yog 2026: ग्रहांच्या फेरबदलाचा मोठा चमत्कार! त्रिग्रही आणि बुधादित्य योगाच्या संयोगाने उजळणार 3 राशींचे भाग्य; होणार अफाट धनलाभ

INS Samarthak Warship: भारताची पहिली बहुउद्देशीय युद्धनौका 'समर्थक' नौदलात दाखल; सागरी सुरक्षा होणार अधिक मजबूत!

Hero च्या दोन नव्या बाइक्स लॉन्च! किंमत 1.27 लाखांपासून सुरू, क्रूझ कंट्रोलसह मिळणार अनेक भन्नाट फीचर्स

SCROLL FOR NEXT