Goa Air Plane Dainik Gomantak
गोवा

विमानाने गोव्‍यात येणाऱ्यांच्‍या खिशाला कात्री

तिकीट दरात वाढ: उन्‍हाळी सुट्यांचा परिणाम, विकेंडमध्ये पर्यटकांची लूट

दैनिक गोमन्तक

पणजी: पर्यटनाचे नंदनवन मानल्‍या जाणाऱ्या गोव्‍यात उन्‍हाळी सुटीमुळे पर्यटकांची गर्दी वाढतच आहे. या पार्श्वभूमीवर देशातील इतर राज्‍यातून येणाऱ्या आणि जाणाऱ्या विमान तिकीट दरांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्‍याचे दिसून येत आहे. आंतरराष्ट्रीय पर्यटनास आलेल्‍या मर्यादा आणि कोरोनाच्‍या भीतीपोटी पर्यटनासाठी विदेशी जाणाऱ्यांमध्ये झालेली घट, यामुळे देशातील इतर राज्‍यांतून येणाऱ्या विमान फेऱ्यांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात गोव्यातून जाण्यासाठीही विमान तिकिटाचा दर पाच हजारांपासून 14 हजारांपर्यंत वाढलेले होते.

पर्यटन हंगामामध्ये तिकीट दरांतील वाढ ही नेहमीची बाब आहे. अनेक विमान कंपन्‍या मागणीचा लाभ उठवण्यासाठी या काळात तिकीट दर वाढवतात, अशी माहिती राजधानी पणजीतील एशिया ट्रॅव्‍हल्सचे व्‍यवस्‍थापक पंकज पटेल यांनी दिली. विमान कंपन्‍यांच्‍या तिकीट दरावर कोणाचेही नियंत्रण नसते. यामुळे आमचे नेहमीचे ग्राहक नाराजी व्‍यक्‍त करतात. पण आम्‍ही केवळ एजंट म्‍हणून काम करत असल्‍याने आम्‍ही काही करू शकत नाही, अशी प्रतिक्रिया कळंगुट येथील एअर ट्रॅव्हल्सचे संचालक डेस्‍मंड डिसोझा यांनी दिली.

एअर इंडिया, स्‍पाईस जेट, गो फ‍स्‍ट, एअर एशिया, इंडिगो, विस्‍तारा आदी विमान कंपन्‍या गोव्‍यात आपली सेवा देतात. एअर इंडिया आणि विस्‍तारा वगळता इतर विमान कंपन्‍या या उच्च मध्यमवर्गीयांना सेवा पुरवण्यात अग्रेसर मानल्‍या जातात. तर एअर इंडिया आणि विस्‍तारा या विमान कंपन्‍या उच्चवर्गीय आणि श्रीमंतांना सेवा देण्यात आघाडीवर आहेत. देशातील बहुतांश राज्‍यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्‍या परीक्षा संपल्‍या असून उन्‍हाळी सुटी सुरू झाली आहे. यामुळे केवळ विकेंडच नव्‍हे तर आठवड्यातील सातही दिवस राज्‍यात देशी पर्यटकांची संख्या वाढत आहे.

सध्यस्‍थितीत दिल्ली ते गोवा विमानातून इकॉनॉमी क्‍लास प्रवासासाठी पाच हजार रुपयांपासून आठ हजार रुपये मोजावे लागत आहेत. प्रिमियम क्‍लाससाठी नऊ हजार तर बिझनेस क्‍लाससाठी तीस ते बत्तीस हजार रुपये आकारले जात आहेत.

जीवाचा गोवा करण्यासाठी राज्‍यात येणाऱ्या मुंबईकरांना इकॉनॉमी क्‍लाससाठी चार ते साडेसात हजार, प्रिमियमसाठी नऊ हजार तर बिझनेस क्‍लाससाठी अठरा ते अडतीस हजार रुपये द्यावे लागत आहेत. गोव्‍यात येणाऱ्या बंगळुरूवासीयांना इकॉनामी क्‍लाससाठी अडीच ते साडेपाच हजार, प्रिमियमसाठी नऊ हजार तर बिझनेस क्‍लाससाठी अठरा ते सत्तावीस हजार रुपये खर्चावे लागत आहेत. पश्‍चिम बंगालमधून येणाऱ्या पर्यटकांना इकॉनॉमी क्‍लाससाठी नऊ ते दहा हजार रुपये, प्रिमियमसाठी साडेपंधरा तर बिझनेस क्‍लाससाठी अडतीस ते बेचाळीस हजार रुपये द्यावे लागत आहेत.

दरवाढ नित्‍याची; पर्यटकांची गोची

पर्यटन हंगाम, विकेंड आणि सणावराच्‍या काळात विमान तिकीट दरांमध्ये वाढ होणे, ही नित्‍याची बाब आहे. एरवी दोन ते अडीच हजार रुपये असलेले तिकीट या काळात पाच ते सात हजारांपर्यंत पोहोचते. डिसेंबरच्‍या मध्यानंतर जानेवारीच्‍या मध्यापर्यंत तर प्रचंड वाढ झाल्‍याचे अनेक पर्यटकांनी अनुभवले आहे. नाताळ नंतर ईडीएम संगीत सोहळा आणि 31 डिसेंबर रोजी मुंबई ते गोवा प्रवास तब्बल एक लाखांना पडतो. ऐनवेळी गोव्‍यात येण्याचा बेत करणाऱ्या ग्राहकांना या काळात विमान कंपन्‍यांकडून अक्षरशः लुटले जात असल्‍याचे यापूर्वी दिसून आले आहे. तर 1 जानेवारीनंतर गोव्‍यातून देशातील अन्‍य शहरांत जाणाऱ्या विमान तिकिटांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होण्याचा अनुभवही अनेकांनी घेतला आहे

इव्‍हेंटचाही परिणाम

बड्या उद्योजक जगतातील मान्‍यवरांचे विवाह सोहळे, वार्षिक सभा, बैठका आणि इतर इव्‍हेंटमुळेही विमानाचे भाव वाढले आहेत. देशातील इतर शहरांच्‍या तुलनेत गोवा लवकर कोरानामुक्‍तीच्‍या दिशेने गेला. यामुळे सुरक्षित स्‍थळ म्‍हणून उच्चवर्गीयांनी आणि श्रीमंत लोकांनी आपापल्‍या कार्यक्रमांसाठी गोव्‍याची निवड केली. देशभरातून येणारे त्यांचे पाहुणे, कुटुंबीय, आमंत्रित मान्‍यवर सहाजिकच विमानाने गोव्‍यात दाखल झाले. या पार्श्वभूमीवरही विमान तिकीट दरवाढ झाल्‍याची माहिती मिळाली.

काल 72 विमाने येणार

भारतीय विमान प्राधिकरणाच्‍या शेड्युलनुसार 25 रोजी राज्‍यातील विविध भागातून सुमारे 64 विमाने दाखल झाली आहेत. उद्या 26 रोजी सुमारे 72 विमाने दाखल होणार असून आज सायंकाळच्‍या माहितीनुसार 27 रोजी 18 विमाने येणार असल्‍याची नोंद होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Goa News Live: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

SCROLL FOR NEXT