भुयार Dainik Gomantak
गोवा

मोपातील भुयारे पाहणीचा केवळ फार्स

पीडित संघटनेचा आरोप: पुरातत्त्व विभाग व बांधकाम कंपनीत हातमिळवणी

दैनिक गोमन्तक

पेडणे: मोपा विमानतळ क्षेत्रात दीड वर्षापूर्वी सापडलेल्या भुयारांची आज अखेर पुरातत्त्व खात्याने पाहणी केली. मात्र, पुरातत्त्व खात्याने केवळ दिखावा म्हणून ही पाहणी केल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. यावेळी बाया वरक, भास्कर नारुलकर व गोपाळ शेट्ये यांनी ही दोन्ही भुयारे पत्रकारांना दाखवली. भास्कर नारुलकर व गोपाळ शेट्ये यांनी पुरातत्त्व विभाग व विमानतळ बांधकाम करणारी कंपनी यांच्यात हातमिळवणी असल्याचा आरोप यावेळी केला.

मोपा विमानतळ पंचक्रोशी पीडित संघटनेचे सचिव बाया वरक यांनी गेल्या वर्षी पुरातत्त्व खात्याला या विमानतळाच्या धावपट्टीवर व भोवताली विमानतळाचे बांधकाम करताना भुयारे सापडली असल्याने त्यासंबंधी पाहणी करण्याचे निवेदन दिले होते. त्यानुसार या भुयारांची संयुक्त पाहणी करण्यासाठी आज दुपारी 3.30 वेळ दिली होती. त्यानुसार समितीचे सदस्य मोपा विमानतळाच्या गेट बाहेर उभे राहिले होते. मात्र, समितीचे सचिव बाया वरक वगळता समितीच्या अन्य कुठल्याही पदाधिकाऱ्यांना गेटच्या आत प्रवेश दिला नाही.

समितीचे सचिव श्री. वरक यांनी सांगितले, की विमानतळाच्या आत अगोदरच पुरातत्त्व विभागाचे सगळे अधिकारी जीएमआर कंपनीचे व्यवस्थापकांसोबत गप्पा गोष्टी करत बसले होते. या अधिकाऱ्यांनी भुयारे कुठे आहेत, लवकर जागा दाखव अशा तऱ्हेचे एकावर एक प्रश्नांचा भडिमार करून दबाव आणण्याचा प्रयत्न केला. विमानतळाचे बांधकाम झाल्यानंतर सुमारे तीन महिन्यानंतर मी तेथे पोचलो होतो. तेथे झपाट्याने काम सुरू असते. आज असलेले उद्या नाही अशी स्थिती असते. त्यामुळे मी भुयारे मिळाली होती त्याचे फोटो दाखवले. गुगल लोकेशन दाखविल्यावर तिथे मला त्यांनी नेले व भुयाराची जागा दाखव म्हणाले. परंतु वृत्तपत्रातून बातम्या प्रसिद्ध झाल्यावर लगेच ही भुयारे बुजविण्यात आली होती. त्यातच आज तिथे मातीचा मोठा थर घातल्याचे दिसले. या ठिकाणी तीन बुलडोझर काम करत होते.

पुरातत्त्व खाते व विमानतळ बांधकाम कंपनी यात काही तरी लपविण्याचा प्रयत्न करत आहे असा मी संशय व्यक्त केल्यावर त्यांनी या अगोदर आम्ही येथे पाहणी केल्याचे सांगितले. त्यावर पाहणी केल्याचा अहवाल आम्हाला द्या अशी मी त्यांच्याकडे मागणी केली. त्यानंतर तेथे जे काही दिसते तसेच आम्ही नमूद करणार असल्याचे सांगून पुरातत्त्व खात्याने आपला पाहणी कार्यक्रम आटोपता घेतल्याचेही श्री. वरक यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Tilak Varma: आशिया कपमध्ये कमाल, आता तिलक वर्मा करणार कॅप्टन्सी! टीमची झाली घोषणा; पाहा संपूर्ण संघ

BJP Rath Yatra Goa: भाजपतर्फे 25 डिसेंबरपर्यंत रथयात्रा, पदयात्रा; मतदारसंघनिहाय मेळावे होणार, स्वदेशीचा नारा करणार बुलंद

PM Surya Ghar Scheme:'पीएम सूर्य घर मुफ्‍त बिजली'च्या जागृतीला चालना, उत्तर गोवा जिल्हा समन्वय समितीच्‍या बैठकीत निर्णय

Pernem: शेतकऱ्यांसाठी घातक असलेला कायदा बदला, कुळ मुंडकार संघर्ष समितीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Mhaje Ghar: 'माझे घर'चे अर्ज सोमवारपासून उपलब्ध; योजना सामान्यांपर्यंत पोहोचवा, CM प्रमोद सावंतांच्या अधिकाऱ्यांना सूचना

SCROLL FOR NEXT