Mopa Airport Dainik Gomantak
गोवा

Manohar Airport: दाबोळीच्या तुलनेत ‘मोपा’चे तिकीट महाग

प्रजासत्ताक दिनाच्या विकेंडला गोव्यात पर्यटक मोठ्या प्रमाणावर येण्याची शक्यता आहे. यामुळे विमान कंपन्यांनी आपले तिकिटांचे दर वाढविले आहेत.

दैनिक गोमन्तक

Manohar Airport: मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रवाशांच्या खिशाला कात्री लावणारा ठरणार आहे. दाबोळीच्या तुलनेत या नवीन विमानतळावर उतरण्यासाठी प्रवाशांना 25 ते 75 टक्के अतिरिक्त तिकीट भाडे द्यावे लागणार आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या विकेंडला गोव्यात पर्यटक मोठ्या प्रमाणावर येण्याची शक्यता आहे. यामुळे विमान कंपन्यांनी आपले तिकिटांचे दर वाढविले आहेत. 25 जानेवारी रोजी मुंबईहून येऊन मोपा विमानतळावर उतरायचे असेल तर किमान 9.913 रुपये तिकीट आहे. मात्र, त्याच दाबोळी विमानतळाचे भाडे किमान 6.229 रुपये इतके आहे.

‘मोपा’ हे खासगी विमानतळ असून जीएमआर कंपनीने त्यावर 2 हजार 870 कोटी रुपये खर्च केले आहेत. उत्तर गोव्यात येणारे 70 टक्के प्रवाशी या नव्या विमानतळाला प्राधान्य देणार, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

या विमानतळाची प्रवासी सेवा शुल्कही जास्त आहे. या विमानतळावर प्रत्येक देशी प्रवाशांमागे 450 रुपये तर आंतरराष्ट्रीय प्रवाशांमागे 1100 रुपये सेवा शुल्क अतिरिक्त आकारले जाणार आहे. पुढच्या वर्षी हा दर अनुक्रमे 430 आणि 730 रुपये असा कमी होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT