Mopa Link road work start Dainik Gomantak
गोवा

‘मोपा’चे काम रोखाल, तर पस्तावाल!, प्रशासनाचा इशारा

शेतकऱ्यांना डावलत काम सुरू; पंचायतीच्या नोटिशीला केराची टोपली

दैनिक गोमन्तक

मोरजी : मोपा लिंक रोडचे काम बंद पाडाल तर पस्तावाल,असा सज्जड इशारा भूसंपादन अधिकारी चंद्रकांत शेटकर तसेच उपजिल्हाधिकारी राजेश आजगांवकर यांनी शेतकरी आणि ग्रामस्थांना दिला. बंद पाडलेले काम पुन्हा सुरू केले. शेतकऱ्यांचा विरोध झुगारुन काम सुरु झाल्याने परिसरात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. (Mopa Link road work start News Updates)

मोपा (Mopa) लिंक रोड विषयी सरकारने बेकायदा जमिनी आणि बेकायदा झाडे कापून शेतकऱ्यांवर अन्याय झाला आहे, तो दूर करण्यासाठी शेतकऱ्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्याचा निकाल लागेपर्यंत रस्त्याचे काम बंद ठेवावे, अशा आशयाची नोटीस वारखंड पंचायतीने लिंक रोडचे कंत्राटदार अशोका बिल्डर , राष्ट्रीय महामार्ग ,वन खाते, उत्तर गोवा (North Goa) जिल्हाधिकारी ,पोलिस अधीक्षक यांना पाठवली होती, परंतु नोटिसा मिळूनही काम बंद ठेवण्याऐवजी पोलिस संरक्षणात 25 रोजी काम जोरात चालू केले. त्यामुळे पंचायतीच्या नोटिशीला कंपनीने केराची टोपली दाखवल्याची भावना पीडित शेतकऱ्यांची झाली. वारखंड पंचायतीने कंपनीकडे कोणती कागदपत्रे आहेत, याची विचारणा करून कागदपत्रे सादर करेपर्यंत काम बंद ठेवावे,असे रोजी नोटिशीद्वारे सूचित केले होते.

दरम्यान मोपा लिंक रोडसाठी झाडे रितसर कापण्याऐवजी ती बुलडोझरद्वारे जमिनीत गाडली जात असतानाच वनखात्याने (Forest) यंत्र जप्त करायला हवीत,पीडित शेतकरी मागणी करत होते.परंतु आपल्याला तसा अधिकार नाही,असे सांगून वन खाते जबाबदारी झटकत असल्यानेे वनखात्याला कोणते अधिकार आहेत, ते तरी पीडित शेतकऱ्यांना सांगावे,अशी जोरदार मागणी मोपा पंचक्रोशी पीडित जन संघटनेचे सरचिटणीस बाया वरक यांनी केली. त्यांच्या या मागणीकडे दुर्लक्ष करत वनाधिकारी दूरवर राहून झाडे कशी गाढली जातात, हे पाहत होते. कोणत्याही शासकीय प्रकल्पासाठी जेवढी झाडे कापली जातात,त्याहून दहापट झाडे इतरत्र लावणे बंधनकारक असते. कंपनीने झाडे लावण्यासाठी नवी जागा कुठे घेतली, ती दाखवावी, अशी जोरदार मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lessons from Animals: प्राण्यांकडूनही शिकता येतात जीवनाचे धडे! मुंग्यांची शिस्त, पक्ष्यांची मेहनत अन् निसर्गाची जादू

Bangladesh Resort Fire: बांगलादेशात रिसॉर्टला भीषण आग, 10 जणांचा होरपळून मृत्यू; जीव वाचवण्याची संधीच मिळाली नाही VIDEO

Trigrahi Yog 2026: ग्रहांच्या फेरबदलाचा मोठा चमत्कार! त्रिग्रही आणि बुधादित्य योगाच्या संयोगाने उजळणार 3 राशींचे भाग्य; होणार अफाट धनलाभ

INS Samarthak Warship: भारताची पहिली बहुउद्देशीय युद्धनौका 'समर्थक' नौदलात दाखल; सागरी सुरक्षा होणार अधिक मजबूत!

Hero च्या दोन नव्या बाइक्स लॉन्च! किंमत 1.27 लाखांपासून सुरू, क्रूझ कंट्रोलसह मिळणार अनेक भन्नाट फीचर्स

SCROLL FOR NEXT