Mopa International Airport Dainik Gomantak
गोवा

Mopa International Airport : ‘मोपा’ला आंतरराष्ट्रीय विमानसेवेची प्रतीक्षाच

विमानतळावरून जानेवारीपासून देशांतर्गत विमानसेवेला सुरुवात झाली

दैनिक गोमन्तक डिजिटल

Mopa International Airport : उत्तर गोव्यातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सुरू होणारी आंतरराष्ट्रीय विमानसेवा लांबणीवर पडली असून आता मे महिन्याअखेर ही सेवा सुरू होण्याची शक्यता आहे.

राज्य नागरी विमान खात्याकडून दिलेल्या माहितीनुसार, 11 डिसेंबर 2022 रोजी पंतप्रधानांच्या हस्ते उद्‌घाटन करण्यात आलेल्या या विमानतळावरून जानेवारीपासून देशांतर्गत विमानसेवेला सुरुवात झाली आहे.

सध्या काही विमान कंपन्या या विमानतळावरून आपली सेवा देत आहेत. यात इंडिगो, गो-एअर आणि अक्सा या विमान कंपन्यांचा समावेश आहे. सध्या देशातीलच 9 शहरांना या विमानतळावरून सेवा (कनेक्टिव्हिटी) सुरू आहे.

25 मार्चनंतर ही सेवा दुप्पट होणार असून मार्चच्या शेवटच्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरू होण्याची शक्यता होती. मात्र, ती लांबणीवर पडली असून मे अखेरपर्यंत ती सुरू होण्याची शक्यता आहे.

जीएमआर कंपनीच्या सूत्रांनुसार, कंपनीने जगभरातल्या अनेक विमान कंपन्यांशी यासंबंधीचे करार केलेले आहेत. आणि आंतरराष्ट्रीय ठिकाणे (डेस्टिनेशन) यांचीही निवड केली आहे.

सुरुवातीच्या टप्प्यात युरोप, रशिया, मध्य आशियाई देशांबरोबर दक्षिण पॅसिफिक देशांमध्ये आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होणार आहे.

कस्टम, इमिग्रेशनसाठी विलंब

कोणत्याही विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्यासाठी केंद्र सरकारच्या कस्टम आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या इमिग्रेशन विभागाची परवानगी लागते. याशिवाय या दोन्हीही विभागांचे स्वतंत्र कक्ष उभारणे अपेक्षित असते.

या विमानतळावरील ब्लॉक सी आणि ब्लॉक डी हे दोन विभाग या सेवेसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. या सुविधांकरताच आंतरराष्ट्रीय विमानसेवेला विलंब होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

Shappora River Water: शापोरा नदीचे पाणी आता थेट अस्नोड्यापर्यंत! साळ बंधाऱ्याचा अखेरचा दरवाजा बंद; दररोज २५ कोटी लिटर पाणी उचलणार

SCROLL FOR NEXT