Red Stone Mining in Goa
Red Stone Mining in GoaDainik Gomantak

Red Stone Mining : नार्वेतील चिरेखाणी चालकांचे धाबे दणाणले; पर्दाफाश होताच मशिनरी रातोरात गायब!

व्यावसायिकांना छाप्याची भीती
Published on

Illeagal Red Stone Mining: नार्वे येथील बेकायदा चिरेखाण व्यवसायाबाबत आवाज उठवताच, संबंधित व्यावसायिकांमध्ये खळबळ माजली आहे. दुसऱ्या बाजूने खाणींवरील जनरेटर्स आदी मशिनरी गायब झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चिरेखाणींवर कोणत्याही क्षणी छापा पडण्याची शक्यता गृहीत धरून संबंधित व्यावसायिकांनी काल रातोरात खाणींवरील जनरेटर्स आदी मशीनरी गायब केल्याची माहिती मिळाली आहे.

डिचोलीतील एक पर्यावरणप्रेमी रमेश गावस यांनी बुधवारी (ता.15) पत्रकारांना सोबत घेऊन या बेकायदा व्यवसायाला वाचा फोडली होती.

Red Stone Mining in Goa
म्हापसा येथील सेंट झेवियर महाविद्यालयात शिवजयंतीला परवानगी नाकारली- ABVP

अंदाजे तीस चिरेखाणी

नार्वे गावात बेकायदा चिरेखाणींचे प्रस्थ वाढले असून, कोमुनिदाद जमिनीत बेधडकपणे या चिरेखाणी कार्यरत आहेत. या गावात तीसच्या आसपास चिरेखाणी सुरू आहेत.

चिरेखाण व्यावसायिकांनी नार्वे गाव पोखरला असून, संपूर्ण गावात धूळ प्रदूषणाची समस्या निर्माण झाली आहे. जलस्रोतांवरही परिणाम झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com