Mopa International Airport | Goa Marathi News | Goa News Dainik Gomantak
गोवा

Mopa International Airport : प्रतीक्षा वाढली; मोपा विमानतळाचा मुहूर्त लांबणीवर

सप्टेंबरमध्ये होणार नवी घोषणा; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची माहिती

दैनिक गोमन्तक

पणजी : मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण करण्याचा 15 ऑगस्टचा मुहूर्त लांबणीवर पडला आहे. त्यामुळे या उड्डाणाच्या नव्या मुहुर्ताची घोषणा सप्टेंबरमध्ये करण्यात येईल. या उड्डाणाचे पहिल्या टप्प्यातील काम अजूनही पूर्ण झाले नसल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्‍नावर उत्तर देताना दिली.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी येत्या 15 ऑगस्टला ‘आझादी का अमृत महोत्सव’ साजरा करताना मोपा विमानतळाचे उद्‍घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असल्याची घोषणा वेळोवेळी केली होती. मात्र कोरोना काळात रेंगाळलेले काम प्रगतिपथावर येण्यास उशीर होत असल्याने हे उद्‍घाटन आता लांबणीवर पडणार आहे असे स्पष्ट केले. या विमानतळासाठी लागणारा कर्मचारीवर्ग हा 80 टक्के गोव्यातीलच असेल अशीही त्यांनी घोषणा केली आहे. काही कर्मचाऱ्यांना विमानतळावरील सुरक्षा व इतर कामे हाताळण्याचे प्रशिक्षण देऊन तत्पर ठेवण्यात आले आहे.

विमानतळासाठी ज्यांच्या जमिनी ताब्यात घेण्यात आल्या आहेत, त्या कुटुंबीयांच्या सदस्यांना प्राधान्य दिले जाणार असल्याचे त्यांनी घोषित केले असले तरी स्थानिकांकडून इतर मतदारसंघांतील अधिक उमेदवारांना संधी देण्यात आली असल्याची टीका होत आहे.

मोपावर प्राधान्‍य गोवेकरांनाच
मोपा विमानतळासाठी आवश्‍यक असलेला कर्मचारीवर्गात स्‍थानिकांना प्राधान्‍य दिले जाईल. मात्र प्रशिक्षित आणि उच्चपदस्‍थ जागा भरताना गुणवत्तेचा आधार घ्‍यावा लागत असला तरीसुद्धा प्राधान्‍यक्रम भूमिपुत्रांनाच द्यावा लागेल. त्‍यानंतर ते इतरांचा विचार करू शकतील, असं बोललं जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT