Mopa International Airport Dainik Gomantak
गोवा

Mopa Airport: कंत्राटदार चिंतेत; उपोषणाची तयारी

Mopa Airport: मुख्यमंत्र्यांकडे विनवणी : मोपा भागातील 60 टक्के लोकांची थकबाकी, न्यायालयातही जाणार

दैनिक गोमन्तक

Mopa Airport: मोपा विमानतळावर 100 हून अधिक छोटे-मोठे कंत्राटदार कार्यरत आहेत. या कंत्राटदारांपैकी 60 टक्के कंत्राटदारांची बिले थकली आहेत. वेळेअगोदर, गुणवत्तापूर्ण, रात्रंदिवस काम केल्यानंतरही पैसे बाकी असल्याने कंत्राटदार मुख्यमंत्र्यांकडे आर्त विनवणी करीत आहेत. काहीजणांनी तर मोपा विमानतळ उद्‌घाटनाच्या पार्श्वभूमीवर उपोषणाला बसण्याची आणि न्यायालयाचा दरवाजाही ठोठावण्याची तयारी चालविली आहे.

राज्य सरकारच्या वतीने गुजरात निवडणुकीच्या निकालानंतर म्हणजे 8 डिसेंबरनंतर पंतप्रधानांच्या हस्ते या मोपा विमानतळाचा उद्‌घाटनाचा घाट घातला आहे. या पार्श्वभूमीवर अनेक कंत्राटदारांची बिले जीएमआर कंपनीने अदा करणे गरजेचे आहे. अन्यथा उद्‌घाटनाच्या कार्यक्रमाला या कामगार आणि कंत्राटदारांच्या उपोषणाचा बट्टा लागू शकतो.

सर्वच कंत्राटदारांकडून सूट मागितली जात आहे. त्यामुळे अनेक कंत्राटदार अन्य मार्गाचा अवलंब करण्याच्या प्रयत्नात आहेत. हा उद्रेक सर्वांनाच महागात पडू शकतो. यापूर्वीही कामगारांनी या विमानतळावर जाळपोळीच्या घटना केल्या होत्या. त्याची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी सरकारने वेळीच हस्तक्षेप करावा, अशी मागणी होत आहे.

मुलगी, आई आयसीयूत तरीही...

  • मोपा येथील कंत्राटदाराची मुलगी आणि आई आयसीयूमध्ये होती. असे असतानाही त्याने रात्रंदिवस काम करून मोपाची धावपट्टी (रनवे) उभारली. आता आपली बिले मिळावीत म्हणून तो वणवण भटकत आहे.

  • जीएमआर कंपनीने त्याच्याकडे 40 लाखांची सूट मागितली आहे. अरुण सोनावणे असे या कंत्राटदाराचे नाव असून त्याने मुख्यमंत्र्यांना भेटण्याचाही प्रयत्न केला पण मुख्यमंत्र्यांनीही हात झटकले आहेत.

  • जीएमआर कंपनीकडून त्याचे 1.25 कोटी रुपये येणे बाकी असून त्याला केवळ 22 लाख मिळाले आहेत. कंपनी आता उर्वरित पैशांमधून 40 लाखांची सूट मागत आहे. दर्जेदार आणि वेळेअगोदर काम केले असताना कंपनीला सूट का द्यायची? असा रास्त प्रश्न तो विचारतो आहे.

आव्हानात्मक :

विमानतळ उभारणीमध्ये सर्वात महत्त्वाचे आणि अत्यंत किचकट काम असते ते धावपट्टी (रनवे) बनविण्याचे. धावपट्टी सर्व हंगामांच्या (ऋतू) हवामानात विमानांना ये-जा करण्यासाठी अनुकूल असावी लागते. प्रामुख्याने अतिवृष्टीच्या काळात धावपट्टी मोकळी राहावी यासाठी अनेक सुविधा केल्या जातात.

20 दिवसांत कष्टपूर्वक काम :

मोपा येथे उभारण्यात आलेली धावपट्टी ही 3.5 किलोमीटरची असून तिच्याभोवतीचा परिसर 16 किलोमीटरचा आहे. हे अत्यंत अवजड, अवघड आणि किचकट काम तिरुपती कॉन्ट्रॅक्टरच्या अरुण सोनावणे या तरुणाने अवघ्या 20 दिवसांत पूर्ण केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Priyanka Chopra In Goa: उकडलेला भात, कॅरम आणि बीच वॉक; प्रियांकानं शेअर केले 'गोवा व्हेकेशन'चे PHOTO, पाहून तुम्हीही व्हाल 'Chill'

FDA Raids: एफडीएची धडक कारवाई! बागा, कळंगुट परिसरात 71 आस्थापनांची तपासणी, दंडात्मक कारवाईसह काजू युनिटला ठोकले टाळे

Viral Post: बंगळूरच्या तरुणाने दिला Cheat Code, गोव्यात टॅक्सी भाड्याचा दर कमी करणारं 'ते' एक वाक्य होतंय व्हायरल!

Shubman Gill Injury Update: भारतीय संघासाठी आनंदाची बातमी, शुभमन गिलं 100 टक्के फिट; दुसऱ्या कसोटीत खेळणार की नाही?

Chat GPT, Gemini, Meta सारखे AI Tools युझर्सना खुश ठेवण्यासाठी खोटी माहिती देतायेत; अभ्यासातून समोर आला धक्कादायक निष्कर्ष

SCROLL FOR NEXT