Manohar International Airport Dainik Gomantak
गोवा

Mopa Airport : खुशखबर! आता गोव्यात खरेदीवर '50 टक्‍क्यांपर्यंत' सूट मिळणार; पर्यटन वृद्धीसाठी खास 'GOX Pass’ सेवा

Mopa Airport GOX Pass: गोव्यात येणाऱ्या ज्या प्रवाशाकडे बोर्डिंग पास असेल त्याला राज्यभरातील निवडक हॉटेल, विविध आस्थापनांतून आरोग्यविषयक खरेदीवर ५० टक्‍क्यांपर्यंत सूट देण्यात येईल. ‘गॉक्‍स पास’ गोव्यात येणाऱ्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवाशांना सेवा पुरवतो.

गोमन्तक डिजिटल टीम

Mopa Airport GOX Pass News

पणजी: गोव्यातील पर्यटनाचा अनुभव वाढवण्यासाठी मोपास्थित मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर ‘गॉक्‍स पास’हा नवा प्रवासी उपक्रम डिझाइन केला आहे. भारतात पहिल्‍यांदाच असा उपक्रम राबवला आहे. गोव्यात येणाऱ्या ज्या प्रवाशाकडे बोर्डिंग पास असेल त्याला राज्यभरातील निवडक हॉटेल, विविध आस्थापनांतून आरोग्यविषयक खरेदीवर ५० टक्‍क्यांपर्यंत सूट देण्यात येईल. ‘गॉक्‍स पास’ गोव्यात येणाऱ्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवाशांना सेवा पुरवतो.

पासमध्‍ये टाइम्स स्क्वेअर लाउंज अँड बार, कॉपरलीफ, क्लब टिटोस, कॅफे मॅम्बो गोवा, आर्टजुना, हायवे किचन, कुटुंभ मल्टीक्युझिन रेस्टॉरंट आणि मॅजेस्टिक प्राइड यांसारख्या लोकप्रिय हॉटेलांसह ३४ हून अधिक भागीदार आउटलेटवर विशेष ऑफर ठेवल्‍या आहेत. फोटो आयडीसह ‘गॉक्‍स बोर्डिंग पास’ सादर करून प्रवासी या सवलतींचा लाभ घेऊ शकतात. गॉक्‍स पास ऑफर ३० डिसेंबर २०२४ पर्यंत वैध आहे.

मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ ऑपरेटरचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी आर.व्ही. शेषन यांनी सांगितले की, गॉक्‍स पास प्रवाशांच्या अनुभववृद्धीसाठी आणि गोव्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी डिझाईन केला आहे. प्रवाशांना फायदे देऊन ‘गॉक्‍स पास’ केवळ प्रवासाचा अनुभवच उंचावत नाही, तर स्थानिक अर्थव्यवस्थेलाही बळकटी देतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

कोहली म्हणाला, ''रुको, मार्कर लेके आता हूँ!'' 4 तास घराबाहेर बसलेल्या चाहत्यासाठी स्वतः धावला; किस्सा वाचून तुम्हीही म्हणाल, 'हाच खरा किंग'

Mhaje Ghar: 'हे सरकारचे ऐतिहासिक पाऊल'! विश्‍वजीत राणेंचे प्रतिपादन; वाळपईत ‘माझे घर’ योजनेचे अर्ज वाटप

मनोज परबांपेक्षा आमचं गोव्यावर अधिक प्रेम, घाटी – घाटी करुनच त्यांचा आमदार निवडून आला; मेटींचा पलटवार

Bird week in India: 'चला, पक्षी वाचवूया, निसर्ग जपूया'! पक्षीशास्त्राचे जनक 'डॉ. सलिम अली' यांचे स्मरण

Serendipity Art Festival: देऊस नोस आकुडी, डबल बील; सेरेंडिपिटी कला महोत्सवातील विशेष नृत्य सादरीकरणे

SCROLL FOR NEXT