Goa Airport Luggage Facility
पणजी: मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांच्या सोयीसाठी अत्याधुनिक ‘सेफक्लॉक’ या स्वयंपूर्ण स्मार्ट डिजिटल लगेज लॉकर सेवेची सुरुवात करण्यात आली आहे. जीएमआर गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडतर्फे ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून प्रवाशांना आपले सामान सुरक्षितपणे साठवण्यासाठी ही एक आधुनिक सोय ठरणार आहे.
‘सेफक्लॉक’ लॉकर अत्यंत सुरक्षित असून ते फक्त फोन क्रमांकाच्या ओटीपी पडताळणीद्वारे उघडता येतात आणि या लॉकरवर सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे २४ तास नजर ठेवली जाते. या डिजिटल लॉकरमुळे प्रवाशांना आपले सामान उचलून फिरावे लागणार नाही, तसेच पारंपरिक पद्धतीच्या तुलनेत ही सुविधा अधिक सुरक्षित आहे, असे जीएमआरतर्फे कळविण्यात आले आहे.
ही सेवा वापरण्यासाठी लॉकरवरील किओस्क स्क्रीनचा वापर करून प्रवाशांना स्वतःचा मोबाईल क्रमांक प्रविष्ट करावा लागतो. त्यानंतर ओटीपीद्वारे पडताळणी होते. नंतर वापरकर्त्यांना आपल्या गरजेनुसार लॉकर बॉक्स निवडता येतो. लॉकर वापरण्याचा कालावधी प्रविष्ट केल्यानंतर डिजिटल पेमेंट करावा लागतो. पेमेंट झाल्यानंतर लॉकर आपोआप उघडतो आणि प्रवासी आपले सामान सुरक्षित ठेवू शकतात.
पर्यटकांसाठी आणि व्यावसायिक प्रवाशांसाठी ही सेवा अत्यंत उपयोगी ठरणार आहे. विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच हॉटेल चेक-आउट केल्यानंतर फ्लाइट उशिरा असल्यास, किंवा अचानक रद्द झाल्यास, प्रवाशांना सामान घेऊन फिरण्याचा त्रास टाळता येईल. तसेच, केवळ एका दिवसासाठी आलेल्या व्यावसायिक प्रवाशांना आपले सामान लॉकरमध्ये ठेवून, हलक्या हाताने शहरात फिरता येईल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.