Mopa Airport| Dainik Gomantak
गोवा

Mopa Airport: मोपा विमानतळावरून हेलिकॉप्टर सेवेचा 13 फेब्रुवारीपासून शुभारंभ

गोमन्तक डिजिटल टीम

Mopa Airport: हच व्हेंचर्स आणि ब्लेड अर्बन एअर मोबिलिटी इंक यांचा संयुक्त उपक्रम असलेल्या फ्लायब्लेड इंडिया (ब्लेड इंडिया) यांनी मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ - मोपा विमानतळावरून 13 फेब्रुवारीपासून प्रवाशांसाठी सेवा सुरू करणार असल्याची घोषणा केली आहे.

ब्लेड इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक अमित दत्ता म्हणाले, आठवड्यातील सहा दिवस प्रवाशांना विमानतळावरून दक्षिण गोव्यातील ताज एक्झॉटिकापर्यंत जाण्यासाठी केवळ 6000 रुपयांमध्ये हेलिकॉप्टरमध्ये आसन नोंदणी करता येणार आहे.

त्याचबरोबर गोव्यातील विविध लोकप्रिय पर्यटन स्थळांबरोबरच शेजारच्या राज्यातील धारवाड आणि हुबळी अशा शहरांसाठीही ब्लेड एनिव्हेअर ही खास चार्टर सेवाही उपलब्ध केली जाणार आहे. लवकरच उत्तर गोव्यातील फोर्ट आग्वाद येथेही ही हवाई प्रवास सेवा सुरू करून सेवाजाळ्याचा विस्तार केला जाणार आहे.

व्यवस्थापकीय संचालक दत्ता म्हणाले, देशांतर्गत पर्यटनाचे एक प्रमुख केंद्र म्हणून गोव्याची ओळख आहे. पर्यटकांना गोव्यात अधिकाधिक वेळ घालवायचा असतो. त्यामुळे प्रवासात कमी वेळ जाईल, यासाठी आम्ही सुरू केलेल्या सेवांसारख्या विविध आवश्यक सेवांना मागणी वाढेल, असा आमचा अंदाज आहे.

आमच्या सेवेचा लाभ घेत पर्यटक आता विमानतळापासून अवघ्या 20 मिनिटांत उत्तर गोव्यातील हॉटेलमध्ये चेक इन करू शकेल.

सामान्य मार्गावरून प्रवासासाठी हा कालावधी 3 तासांपर्यंतचा आहे. सुलभ उपलब्धता, प्रभावी जोडणी आणि कमी प्रवास कालावधी या वैशिष्ट्यांसह लघु हवाई प्रवासासाठीचा एक उत्तम प्लॅटफॉर्म म्हणून ब्लेडची ओळख बनली आहे.

बुकिंग सेवा सुरू

गोव्यातील पर्यटनाचा भरपूर आनंद लुटता यावा यासाठी ब्लेडद्वारे हॉटेलच्या चेक-इन, चेक-आउट वेळांशी सुसंगत असे दिवसातून दोनवेळा परतीच्या प्रवासाची सुविधाही दिली जाणार आहे. सकाळी 11 ते 12 आणि दुपारी 12.30 ते 1.30 या वेळेत ही परतीच्या प्रवासाची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime News: गोव्यातील धक्कादायक प्रकार! एका भावाकडून दुसऱ्या भावाच्या होणाऱ्या बायकोचा लैंगिक छळ

Mhadei Water Dispute: ‘म्‍हादई’च्‍या मुद्यावरून काँग्रेस व भाजपमध्‍ये 'तू तू - मैं मैं'

Rarest Birds in World: जगातील 'हे' दुर्मिळ पक्षी नामशेष होण्याच्या वाटेवर; जाणून घ्या

२१ कुटुंबे नव्या घरात करणार गणरायाचे स्वागत! राणे दाम्पत्यामुळे गणेशोत्सव ठरणार खास

भारतीयांना दिवसाला प्राप्त होतात 12 फसवे मेसेज; आतापर्यंत 93,000 हून अधिक टेलिकॉम स्कॅम!

SCROLL FOR NEXT