Goa Health: आजारी रजेसाठी बनावट वैद्यकीय प्रमाणपत्रे

पोलिस खात्यातील काही कॉन्स्टेबल्सनी रजेसाठी आजारी असल्याचे बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र सादर केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
Goa Health
Goa HealthDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Health: पोलिस खात्यातील काही कॉन्स्टेबल्सनी रजेसाठी आजारी असल्याचे बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र सादर केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यामुळे खळबळ उडाली आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी याची गंभीर दखल घेत वारंवार आजारी रजा घेतलेल्या कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू केली आहे.

ज्यांची प्रकरणे प्रथमदर्शनी उघडकीस आली आहेत, त्यांची खात्यांतर्गत चौकशी सुरू केली आहे. मात्र, या कॉन्स्टेबल्सनी राजकीय दबाव आणल्याने वरिष्ठ अधिकारीही शिस्तभंगाची कारवाई करण्याबाबत चालढकलपणा करत आहेत.

काही पोलिस कर्मचारी हे नेहमीच कामावर गैरहजर असतात. बरे नसल्याचा दावा करण्यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्रे त्यांच्या विभागामार्फत वा पोलिस स्थानकामार्फत पाठवतात. मात्र, या प्रमाणपत्रांची पडताळणी होत नाही.

आजारी असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र त्यांनी पोलिस वैद्यकीय अधिकारी (पीएमओ) किंवा शक्य नसल्यास जवळच्या सरकारी आरोग्य केंद्र किंवा इस्पितळातील डॉक्टरांकडून घेणे आवश्‍यक आहे. मात्र, दोन प्रकरणांमध्ये ही वैद्यकीय प्रमाणपत्रे बनावट असल्याचे उघडकीस आल्याने पोलिस यंत्रणा खडबडून जागी झाली आहे.

Goa Health
Banda : गोवा बनावटीची दारु जात होती महाराष्ट्रात; पोलिसांच्या हाती तब्बल पावणेदोन कोटींचे घबाड

हा प्रकार गंभीर असल्याने वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी संबंधित विभागप्रमुखाला चौकशीचे निर्देश दिले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आजारी रजेसाठी सादर केलेल्या प्रमाणपत्राची स्थानक किंवा संबंधित विभागाच्या प्रमुखांकडून पडताळणी केली जात नाही किंवा पोलिस वैद्यकीय अधिकारी (पीएमओ) यांच्याकडून पडताळणी केल्याशिवाय ती स्वीकारली जात आहेत.

...तर बनवेगिरीचा गुन्हा

यासंदर्भात एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, दोन कॉन्स्टेबल्सची आजारी रजेची वैद्यकीय प्रमाणपत्रे बनावट असल्याचे उघडकीस आल्याने वारंवार रजेवर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी सुरू केली आहे.

जी प्रमाणपत्रे बनावट आढळतील, त्यांची खात्यांतर्गत चौकशी सुरू करून बनवेगिरीचा गुन्हाही नोंद करण्याचा पर्याय आहे. मात्र, जे खरेच आजारी आहेत, त्यांना रजेबाबत अनेक समस्यांना सामोरे जाण्याची शक्यता आहे. प्रत्येक आजारी रजेच्या वैद्यकीय दाखल्याकडे आता संशयाने पाहिले जाणार आहे.

Goa Health
Mahadayi Water Dispute: कर्नाटकचा आडमुठेपणा कायम

अधिकारी, डॉक्टरही गुंतल्याचा संशय

नियमित रजा न मिळाल्याने कर्मचारी आजारी रजा घेऊन इतर कामे करतात, हे संबंधित पोलिस अधिकाऱ्यांनाही माहीत असते. मात्र, काही अधिकाऱ्यांची स्वतःची कामे त्यांच्याकडून होत असल्याने त्याकडे दुर्लक्ष करण्याचे प्रकार सुरू आहेत.

ही दोन प्रकरणे उघडकीस येण्यापूर्वी त्याची दखल घेतली नव्हती. मात्र, आता हे अधिकारी जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करू लागले आहेत. ही प्रमाणपत्रे देण्यामागे काही आरोग्य केंद्रातील वा इस्पितळातील डॉक्टरांचे हातही गुंतले असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

असे आले प्रकरण उघडकीस

  •   एका हेड कॉन्स्टेबल्सने आजारी रजेसाठी तब्बल सातवेळा वैद्यकीय प्रमाणपत्रे सादर केली आहेत.

  •   ड्युटी करायला नको म्हणून त्याने ही युक्ती लढविली होती.

  •   त्यासाठी त्याने म्हापशातील एका इस्पितळातील डॉक्टराच्या नावाने बनावट वैद्यकीय प्रमाणपत्रे दिली आहेत.

  •   छाननीमध्ये ही प्रमाणपत्रे त्या इस्पितळातून त्या डॉक्टराने दिल्याची नोंदच नाही.

  •   त्या प्रमाणपत्रांवर संबंधित इस्पितळाचा रबर स्टॅम्प, डॉक्टराचे नाव व सहीही आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com