उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर: पेडणे Dainik Gomantak
गोवा

पेडणेतील युवकांची जगावर राज्य करण्याची क्षमता

मोपा विमानतळावर सर्व प्रकारच्या नोकऱ्या पेडणेतील युवकाना रोजगार देण्याची क्षमता आहे.

दैनिक गोमन्तक

मोपा विमानतळावर सर्व प्रकारच्या नोकऱ्या पेडणेतील युवकाना रोजगार देण्याची क्षमता आहे. त्यासाठी आवश्यक्षक ते पूर्वप्रशिक्षण घेण्याची गरज आहे , युवकामधील कौशल्याचा विकास करण्यासाठी जिएमआर कंपनीने पूर्व प्रशिक्षण देण्यासाठी युवकांची निवड केली आहे. हे प्रशिक्षण घेवून पेडणेचा युवक कुठेही जगाच्या पाठीवर जावून राज्य करू शकतो असे उद्गार उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी पेडणे येथे युवा कौशल्य रोजगार भरती कार्यक्रमात काढले. (Mopa Airport has the potential to provide employment to the youth of Pernem)

आज शुक्रवार रोजी जीएमआर विमानतळ बांधकाम कंपनीने पेडणे सरकारी रेस्ट हाऊस येथे एकूण 70 युवकाना पूर्वप्रशिक्षण रोजगार भरती आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांच्या हस्ते नियुक्ती पत्रे वितरीत केल्यानंतर ते बोलत होते.

या वेळी पेडणे भाजपा मंडळ अध्यक्ष तुळसीदास गावस ,पेडणे नगराध्यक्ष उषा नागवेकर , उपनगराध्यक्ष मनोज हरमलकर , नगरसेविका तृप्ती सावळ देसाई , नगरसेविका विशाखा गडेकर , हरमल जिल्हा पंचायत सदस्य रंगनाथ कलशावकर , तोरसे जिल्हा सदस्य सीमा खडपे, धारगळ जिल्हा सदस्य मनोहर धारगळकर वारखंड सरपंच संजय तुळसकर , विमानतळ कंपनीचे अधिकारी मिलिंद पैदरकर , पंच अब्दुल नाईक , उल्हास देसाई ,प्रकाश कांबळी , जगन्नाथ देसाई ,आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी बोलताना पूर्व प्रशिक्षण घेतल्याने युवकांचे कौशल्याचे दर्शन होते . शिस्त मिळते . शिक्षण झाले म्हणून होत नाही कसे बोलावे कसे वागावे हे संस्कार म्हत्वाचे आहे . प्रशिक्षण घेणारे पेडणेकर राज्यात अग्रगण्य आहे असा विश्वास व्यक्त केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'Ayushman Card'च्या नियमात मोठा बदल, 'या' आजारांवर खाजगी रुग्णालयात मिळणार नाही मोफत उपचार

IND vs ENG 4th Test: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये घडला इतिहास! इंग्लंडने पटकावले पहिले स्थान; केला 'हा' नवा पराक्रम

‘बाबा, माझ्या भावाला ओरडू नका!’: 5 वर्षांची चिमुकली 3 वर्षांच्या भावासाठी बाबांसमोर ढाल बनून उभी राहिली; हृदयस्पर्शी Video Viral

Islamic State Rebels Attack: कांगोमध्ये रक्तपात! चर्चवरील हल्ल्यात 21 जणांचा मृत्यू, IS समर्थित दहशतवाद्यांचा हात

IND vs ENG 4th Test: गिल-राहुलचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या भूमीवर रचला नवा इतिहास, मोडला 23 वर्ष जुना रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT