Mopa International Airport | Goa Marathi News | Goa News Dainik Gomantak
गोवा

Mopa Airport : उद्घाटनाची गोवेकरांना प्रतीक्षा; मोपा विमानतळाचा कायापालट सुरुच

गोव्याची शान असलेली कुळागरे, पोफळीच्या बागायती या ठिकाणी फुलणार आहेत. तसेच बॉटल पाम व इतर शोभेची झाडे लावण्याचा सपाटा सुरू झाला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Mopa Airport : मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाचा कायापालट करण्याचे काम सुरू झाले आहे. गोव्याची शान असलेली कुळागरे, पोफळीच्या बागायती या ठिकाणी फुलणार आहेत. तसेच बॉटल पाम व इतर शोभेची झाडे लावण्याचा सपाटा सुरू झाला आहे. उंच झाडांचा विमानांना अडथळा होऊ शकतो त्यामुळे सगळी झाडे बुटकीच असतील याची खात्री करूनच ती निवडण्यात आली आहेत. पूर्ण वाढ झालेली किमान 5 वर्षे वयाची झाडे लावण्यास प्रारंभ झाला आहे.

झाडे लावण्याचे काम एका मोठ्या नर्सरी फार्मला देण्यात आले असून जेसीबीच्या साहाय्याने खड्डे खोदले जात आहेत. तर क्रेनच्या साहाय्याने ही मोठी झाडे लावण्यात येत आहेत, अशी माहिती तेथील एका अधिकाऱ्याने दिली.

पावसाळ्यात पडझड होणार नाहीत अशीच झाडे निवडली असली तरी विमानतळाबाहेर मात्र जंगली झाडे खूप आहेत. विमानतळाची धावपट्टी बनविण्यासाठी 72 हजार झाडांची कत्तल करावी लागली. परवाना न घेता झाडे कापली जात असल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दखल घेऊन स्थगिती दिली होती. जेवढी झाडे कापली जातील त्याच्या तिप्पट संखेने झाडे लावली जातील, असे आश्‍वासन न्यायालयाला दिले होते.

कुळागराचे स्वरूप

विमानतळाला अडथळा होणार म्हणून मोठी झाडे कापण्यात आली. पोफळीची लागवड करून या परिसराला कुळागराचे स्वरूप देण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. ही झाडे बुटक्याच जातीची असतील याची खबरदारी घेण्यात आली असली तरी हे मोपा विमानतळ सदैव हिरवागार ठेवण्याचा प्रयत्न राहील, असे येथील अधिकाऱ्याने सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: खरी कुजबुज; तरीही केजरीवालांचे ‘एकला चलो’ का?

Goa: RSSच्या विजयादशमीला मोन्‍सेरात उपस्‍थित! 100 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल केले अभिनंदन; उत्पल पर्रीकरांची गणवेशात उपस्‍थिती

Bhuipal: रात्री येत होता घरी, जबरदस्ती गाडीत बसवण्याचा केला प्रयत्न; 12 वर्षीय मुलाच्या प्रसंगावधानामुळे अपहरणाचा डाव फसला

Water Supply Revenue: पाणी गळती, नादुरुस्त मीटर्स! सरकारला 5 कोटींचा फटका; नासाडी थांबवण्यासाठी एजन्सीची नेमणूक

Aldona: संतापजनक! हळदोण्यात पाळीव कुत्र्याच्या जबड्यावर झाडली गोळी; स्थानिकांची कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT