Agriculture Dainik Gomantak
गोवा

Mopa Airport : ‘मोपा’ विमानतळामुळे शेतीची हानी

Mopa Airport Project : प्रकल्‍पामुळे समस्‍या सुटण्‍याऐवजी अधिकच वाढल्‍या

गोमन्तक डिजिटल टीम

मोरजी, मोपा विमानतळावर काम सुरू असताना पहिल्या पावसाने उगवे गावातील काजू बागायती आणि शेतात पाण्याबरोबर माती वाहून आली होती. तोच प्रकार पुन्हा घडत असल्याने शेतकरी संताप व्यक्त करत आहेत.

आता हे मातीमिश्रीत पाणी उगवे, निगळये या भागात घुसत आहे. त्याबद्दल शेतकरी उदय महाले यांनी नाराजी व्यक्त करून सरकारने जीएमआर कंपनीवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

चिखलाचे पाणी थेट शेतीत घुसून ती नापीक बनण्याचा प्रकार

घडत आहे. याची दखल सरकारने घेऊन शेती वाचविण्‍यासाठी प्रयत्‍न करावेत आणि कंपनीवर कडक कारवाई करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

लोकप्रतिनिधींनी दिलेली आश्‍‍वासने हवेत विरली

मोपा विमानतळामुळे पेडणे तालुक्याचा विकास होईल अशी अपेक्षा तालुक्यातील जनतेने धरली होती आणि तसे ठोस आश्वासन निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी निवडणुकीपूर्वी आणि नंतरही दिले होते. परंतु या प्रकल्पाद्वारे जनतेचे प्रश्न सुटण्‍याऐवजी वाढतच चालले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pankaj Dheer: महाभारतातील 'कर्ण' काळाच्या पडद्याआड! ज्येष्ठ अभिनेते पंकज धीर यांचे निधन, मनोरंजन विश्वात शोककळा

‘त्या’ स्वप्नाला मूर्त स्वरुप येण्यापूर्वीच 'पात्रांव रवी नाईक' यांनी जगाचा निरोप घेतला

'चाणक्य हरपला'! फोंड्यात शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार; माजी मुख्यमंत्र्यांच्या निधनाने सर्वपक्षीय नेत्यांमध्ये शोककळा

Goa Today's News Live: सार्वजनिक सुट्टीमुळे दावर्ली पंचायत निवडणूक रद्द, उडाला गोंधळ

Footprints and Frames: मुंबई ते गोवा मार्गावरील कथा पहा चित्रांमध्ये! नॉस्टेल्जीयाच्या पाऊलखुणा

SCROLL FOR NEXT