law Minister Nilesh Cabral Dainik Gomantak
गोवा

Margao येथे ''मूट प्रॉब्लेम्स आभासी तंटे'' या स्पर्धेचे आयोजन

सामाजिक माध्यमातून राजकारण्यांवर विनाकारण टीका केली जाते.

दैनिक गोमन्तक

Margao: सामाजिक माध्यमातून राजकारण्यांवर विनाकारण टीका केली जाते. विधायक म्हणून जिंकून आलेल्या आमदारांचे खरे काम कायदे तयार करणे हे जरी असले, तरी प्रत्यक्षात त्यांना गटार बांधणीपासून मतदासंघांत कुणी आजारी पडला, तर त्याला इस्पितळात दाखल करण्यापर्यंतची तयारी करण्याचे काम करावे लागते याची सर्वांनी जाणीव ठेवण्याची गरज आहे, अशी प्रतिक्रिया कायदामंत्री नीलेश काब्राल यांनी व्यक्त केली.

मडगाव येथील विद्या विकास मंडळाच्या कारे कायदा महाविद्यालयाने आयोजित केलेल्या ‘मूट प्रॉब्लेम्स’ आभासी तंटे या स्पर्धेचे उद्‍घाटन करताना त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. राजकारणी लोकांची सेवा करत असतात, बदल्यात नागरिकांनी त्यांच्यावर फक्त टीका न करता चांगल्या कल्पना आणि सूचना पुढे आणून विकास आणखी चांगला कसा होईल यासाठी सहकार्य करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

डॉ. कार्मु डिसोझा आंतर महाविद्यालयीन आभासी खटले स्पर्धेच्या संकल्पनेच्या पत्रकाचे त्यांनी यावेळी अनावरण केले. ही स्पर्धा कारे कायदा महाविद्यालय माजी विद्यार्थी संघटनेने आयोजित केली असून यावेळी संघटनेचे अध्यक्ष संजित सावंत देसाई, गोवा विद्यापीठाच्या कायदा विभागाचे माजी डीन डॉ. मारियान पिन्हेरो, महाविद्यायाचे प्राचार्य डॉ. साबा डिसिल्वा व अन्य मान्यवर उपस्थित होते. सुरवातीला संजीत सावंत देसाई यांनी स्वागत केले, तर सुधीर नाईक यांनी आभार मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's Live News: 'कॅश फॉर जॉब'; त्यांनी "क्लीन चीट" शब्द कुठेच वापरला नाही - मुख्यमंत्री स्पष्टच बोलले!

भाजपने IFFI आंतरराष्ट्रीय फ्रॉड फेस्टिव्हल केलाय, गोवन फिल्म विभागावरुन काँग्रेसने सरकारला विचारला मोठा सवाल

Goa Crime: गोव्यात आंतरराष्ट्रीय मानवी तस्करी रॅकेटचा भांडाफोड; ओमानमध्ये नोकरीचे आमिष देऊन महिलांना फसवलं, 2 अटक

Maharashtra Election Holiday: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक मतदानासाठी गोवा सरकारची भरपगारी सुट्टी; आदेश जारी

Mapusa: बेकायदा नोकरभरतीवरून म्‍हापसा पालिका बैठक तापली; 20 पैकी 11 नगरसेवकांचे ‘वॉक आऊट’

SCROLL FOR NEXT