अमरावती: बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे निर्माण झालेले मोंथा चक्रीवादळ मंगळवारी संध्याकाळी आंध्र प्रदेशातील मछलिपटणम आणि काकिनाडा यादरम्यानच्या किनारपट्टीवर धडकले. मोंथामुळे येथे वेगाने वारे वाहत असून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. चक्रीवादळामुळे मंगळवारी संध्याकाळी एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.
चक्रीवादळामुळे आंध्र प्रदेशातील ४०३ मंडळांना धोका निर्माण झाला असून राज्य सरकारने २२ जिल्ह्यांत मदत आणि विस्थापन मोहिमांना वेग दिला आहे. आपत्कालीन उपाययोजना सक्रिय केल्या आहेत आणि आपत्ती प्रतिसाद पथक तैनात केली आहेत.७६,००० पेक्षा लोकांना ४८८ मदत केंद्रांत हलविण्यात आला आहे.
मोंथा चक्रीवादळामुळे येथील किनारपट्टीजवळी जिल्ह्यांतील रेल्वे सेवा विस्कळित झाली असून, दक्षिण मध्य रेल्वेचे अधिकारी ए. श्रीधरन यांनी दिलेल्या माहितीनुसार १२२ रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या असून, २९ रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. मोंथा चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका हा विशाखापट्टणम ते विजयवाडा यादरम्यानच्या गावांना फटका बसला आहे.
मोंथा वादळाचा फटका गोव्यातून जाणाऱ्या शालिमार एक्सप्रेसला आज बसला. वास्कोहून सकाळी ६.३० वाजता सुटणारी शालिमार एक्सप्रेस दुपारी १२ वाजता रवाना करण्यात आली. वादळामुळे अनेक रेल्वेच्या वेळा बदलण्यात आल्याने ही रेल्वेही नियोजनानुसार उशिरा सोडण्यात आली. यामुळे सकाळी रेल्वेस्थानकावर आलेल्या प्रवाशांना तिष्ठत रहावे लागले.
दरम्यान, मोंथा चक्रीवादळाच्या प्रभावामुळे कोकण पट्ट्यात मोठ्या प्रमाणात पावसाची बरसात झाली परंतु आता धोका टळला आहे. गोव्यावर या वादळाचा परिणाम झालेला नाही, असे गोवा वेधशाळेचे नहुष कुलकर्णी यांनी सांगितले. राज्यात बुधवारीही यलो अलर्ट कायम असेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.