Goa Rain Updates Dainik Gomantak
गोवा

Goa Rain Update: पणजीत मुसळधार! 24 तासांत 202 मिमी पावसाची नोंद; गोव्यात आजही जोरदार पावसाची शक्यता

कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्रातील कोकण आणि मुंबई भागात पुढील तीन ते चार तास मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

Pramod Yadav

Goa Rain Update: गोव्यात मागील काही दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. गेल्या दोन दिवसात राज्यात विविध ठिकाणी पडलेल्या मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी झाडे आणि घरांची पडझड झाली.

गेल्या 24 तासांत राजधानी पणजीत सर्वाधिक 202 मिमी पाऊस पडला असून, सांगे तालुक्यात सर्वात कमी 84.9 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

गोवा वेधशाळेने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार

गेल्या 24 तासांत म्हापसा येथे 184 मिमी, पेडणे 151.4 मिमी, पणजी 202.9 मिमी, ओल्ड गोवा 164 मिमी, साखळी 165.6 मिमी, काणकोण 117.6 मिमी, दाबोळी 193.4 मिमी, 118.6 मिमी, मुरगाव 110 मिमी, केपे 110 मिमी आणि सांगे 84.9 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

एक जूनपासून नोंद झालेल्या पावसाची आकडेवारी

म्हापसा येथे 552.1 मिमी, पेडणे 480.4 मिमी, पणजी 453.4 मिमी, ओल्ड गोवा 452 मिमी, साखळी 469.2 मिमी, काणकोण 530.3 मिमी, दाबोळी 509.5 मिमी, मडगाव 664.1 मिमी, मुरगाव 442.3 मिमी, केपे 570 मिमी आणि सांगे 521.7 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

पुणे हवामान खात्याचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्रातील कोकण आणि मुंबई भागात पुढील तीन ते चार तास मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. गेल्या 24 तासांत कोकणातील काही भागांत 70 ते 100 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

मुंबईत गेल्या तीन तासांपासून जोरदार पाऊस झाला असून, पुढील 3, 3 तास सुरू राहण्याची दाट शक्यता आहे. असेही होसाळीकर यांनी म्हटले आहे.

गोव्यात आणखी दोन दिवस पावसाचा यलो अलर्ट

गोवा वेधशाळेने राज्यात पावसाबाबत आणखी दोन दिवस यलो अलर्ट देण्यात आलेला आहे. 28 आणि 29 जून रोजी राज्यात काही भागात जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT