Monsoon Update Dainik Gomantak
गोवा

गोव्यात जूनच्या सुरुवातीलाच धडकणार मॉन्सून

अखेर ‘वरुणराजा’ अंदमानमध्ये

दैनिक गोमन्तक

पणजी: ‘तो’ कधी येणार याची प्रतीक्षा संपली आहे. अंदमान निकोबारसह बंगालच्या खाडीवर मॉन्सूनचे आगमन झाले आहे, अशी आनंदवार्ता भारतीय हवामान खात्याने आज दिली. मॉन्सून यंदा प्रथमच चक्क 6 दिवस अगोदर अंदमानात दाखल झाला. गोव्यात जूनच्या सुरवातीलाच मॉन्सून धडकणार, असा अंदाज हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात आला आहे.

साधारणपणे 1 जूनला मॉन्सून केरळात सक्रिय होतो. यंदा मॉन्सून केरळमध्ये 27 मे रोजी सक्रिय होईल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. त्यामुळे गोव्यातही तो नियमित 5 जूनपेक्षा अगोदर येईल. अधिक माहितीनुसार, पुढील 5 दिवस अंदमान आणि केरळमधील काही शहरांमध्ये मुसळधार पाऊस होईल. केरळसह दक्षिण भारतातील काही राज्यांमध्ये पाऊस सुरू असताना गोव्यासह महाराष्ट्रातील नऊ जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

19, 20 मे ला जोरदार पावसाची शक्यता

हवामान खात्याच्या गोवा वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात १८, १९ आणि २० मे रोजी विजांच्या कडकडाटाबरोबरच जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. सध्या राज्यात ढगाळ आणि कोरडे वातावरण आहे. १९ आणि २० मे दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता आहे.

सध्या हिंद महासागरात पावसासाठीची अनुकूल स्थिती निर्माण झाल्याने मॉन्सून २७ मेपर्यंत केरळमध्ये येण्याची शक्यता आहे आणि पुढे टप्प्याटप्प्याने तो सक्रिय होईल.

- डॉ. रमेश कुमार, मॉन्सून तज्ज्ञ

राज्यात मॉन्सून हा सर्वसाधारणपणे 5 जूनला दाखल होतो. केरळमध्ये यंदा तो 5 दिवस अगोदर दाखल होत आहे. गोव्यात मॉन्सून सक्रिय होण्यासाठी अनेक गोष्टींची आवश्यकता असते. मात्र, तो नियमित वेळेपेक्षा लवकर येईल हे निश्चित.

- एम. राहुल, मॉन्सून अधिकारी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mhadei River: ‘पिण्यासाठी पाणी’ हे कर्नाटकचे नाटक! ‘म्हादई’ तिन्ही राज्यांसाठी महत्त्वाची; कॅप्टन धोंड यांचे प्रतिपादन

School Bag Weight: ..विद्यार्थ्यांचा खांद्यावर दप्तराचे 'वाढते' ओझे! केंद्राच्‍या निर्णयाकडे गोव्याची पाठ; परिपत्रकाला ‘केराची टोपली’

UTAA: गोविंद गावडे, वेळीप यांनी स्वार्थासाठी संघटनेचा वापर केला! शिरोडकरांचा हल्लाबोल; हुकूमशाही कारभाराचा आरोप

Goa Politics: खरी कुजबुज; साडेसहा कोटींच्या मंडपाचा शोध!

Pandharpur Wari: पावलो पंढरी वैकुंठ भुवनी! वैष्णवांचा मेळा डेरेदाखल, 15 लाख भाविकांची मांदियाळी

SCROLL FOR NEXT