Rain  Dainik Gomantak
गोवा

देशात ‘मॉन्सून’साठी पोषक वातावरण ; गोव्यात आज तुरळक पावसाची शक्‍यता

‘असनी’ निवळले; आंध्र किनारी भागात कमी दाबाचा पट्टा

दैनिक गोमन्तक

पुणे : नैॡत्य मोसमी वारे (मॉन्सून) दक्षिण अंदमान समुद्र आणि आग्नेय बंगालच्या उपसागरात येत्या रविवारपर्यंत (ता. 15) दाखल होण्यासाठी पोषक वातावरण निर्माण होत असल्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने गुरुवारी (ता. 12) दिला. सध्या बंगालच्या उपसागरात आलेले ‘असनी’ हे चक्रीवादळ निवळत असून, नैॡत्य मोसमी वाऱ्यांसाठी पोषक वातावरण निर्माण होत आहे. (monsoon to arrive soon in India Light shower today in Goa)

सध्या असनी चक्रीवादळ निवळत असले आंध्रप्रदेशच्या किनारपट्टी परिसरावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे.

गोव्यात दिवसभर ढगाळ वातावरण

राज्‍यात गुरुवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. पणजी वेधशाळेने आज तुरळक पावसाची शक्‍यता वर्तवली होती. पण कुठेही पाऊस पडला नाही. राज्‍यात 32.06 अंश सेल्‍सियस तापमानाची नोंद झाली. शुक्रवारी काही ठिकाणी मेघगर्जनेसह मध्यम तर काही ठिकाणी तुरळक पाऊस पडेल. 14 आणि 15 रोजी हवामान कोरडे राहील, अशी शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे.

पुढील चार आठवड्यांचा पावसाचा अंदाज

13 ते 19 मे - अंदमान समुद्रावर जोरदार पावसाची शक्यता

20 मे ते 2 जून - अरबी समुद्रावरील वर्धित पावसाची शक्यता

20 मे पासून पुढे - अरबी समुद्रात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता

आंध्रात पाऊस

शुक्रवारी आंध्र प्रदेश व परिसरात पावसाचा इशारा दिला आहे. तसेच दक्षिणेकडील राज्यांसह महाराष्ट्रातील काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. वेधशाळेच्या अंदाजानुसार, यंदा मॉन्सून हंगामात सरासरीच्या 99 टक्के पावसाची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lessons from Animals: प्राण्यांकडूनही शिकता येतात जीवनाचे धडे! मुंग्यांची शिस्त, पक्ष्यांची मेहनत अन् निसर्गाची जादू

Bangladesh Resort Fire: बांगलादेशात रिसॉर्टला भीषण आग, 10 जणांचा होरपळून मृत्यू; जीव वाचवण्याची संधीच मिळाली नाही VIDEO

Trigrahi Yog 2026: ग्रहांच्या फेरबदलाचा मोठा चमत्कार! त्रिग्रही आणि बुधादित्य योगाच्या संयोगाने उजळणार 3 राशींचे भाग्य; होणार अफाट धनलाभ

INS Samarthak Warship: भारताची पहिली बहुउद्देशीय युद्धनौका 'समर्थक' नौदलात दाखल; सागरी सुरक्षा होणार अधिक मजबूत!

Hero च्या दोन नव्या बाइक्स लॉन्च! किंमत 1.27 लाखांपासून सुरू, क्रूझ कंट्रोलसह मिळणार अनेक भन्नाट फीचर्स

SCROLL FOR NEXT