उदयपूरमध्ये काँग्रेसचे विचारमंथन, जाणून घ्या तीन दिवसीय चिंतन शिबिरात काय चर्चा होणार

19 वर्षांनंतर काँग्रेस असे चिंतन शिबिर करत आहे, शिबिराची सुरुवात सोनिया गांधी यांच्या भाषणाने होईल
Sonia Gandhi, Rahul Gandhi And Priyanka Gandhi
Sonia Gandhi, Rahul Gandhi And Priyanka Gandhi Dainik Gomantak
Published on
Updated on

उदयपूर: एकापाठोपाठ एक राज्याच्या निवडणुकांमध्ये पराभव पत्करावा लागलेल्या काँग्रेसने राजस्थानच्या उदयपूरमध्ये चिंतन शिविराचे आयोजन केले आहे. काँग्रेसचे हे चिंतन शिबिर आजपासून तीन दिवस चालणार आहे. सलग पराभवावर काँग्रेस येथे तीन दिवस विचारमंथन करणार आहे. चिंतन शिबिरात काँग्रेसचे संपूर्ण लक्ष संघटनेत बदल आणि पुढील लोकसभा निवडणुकीच्या कृती आराखड्यावर असेल. (Congress Chintan Shivir)

चिंतन शिबिराची सुरुवात सोनिया गांधी यांच्या भाषणाने होईल

दुपारी 2 वाजता सोनिया गांधी यांच्या भाषणाने चिंतन शिबिराची सुरुवात होईल. यामध्ये काँग्रेसचे 430 प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. आज आणि उद्या सायंकाळपर्यंत विविध मुद्यांवर विविध गटांमध्ये चर्चेची फेरी होणार आहे. त्यानंतर जो प्रस्ताव तयार होईल, त्यावर 15 मे रोजी होणाऱ्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत शिक्कामोर्तब होणार आहे.

काँग्रेस नेते मनीष तिवारी चिंतन शिबिराबद्दल काय म्हणाले

चिंतन शिबिराबाबत काँग्रेस नेते मनीष तिवारी म्हणाले की, '19 वर्षांनंतर काँग्रेस असे चिंतन शिबिर करत आहे, प्रत्येकाला न डगमगता आपले मत मांडण्याची संधी मिळाली पाहिजे.' दरम्यान चिंतन शिबिरात पक्षाध्यक्षाबाबत कोणतीही चर्चा होणार नाही, मात्र राहुल गांधी पक्षाची सूत्रे हाती घेण्याचा गांभीर्याने विचार करत असल्याची मोठी माहिती समोर आली आहे.

राहुल गांधी आणि पक्षाचे इतर अनेक ज्येष्ठ नेते गुरुवारी पक्षाच्या चिंतन शिबिरात सहभागी होण्यासाठी ट्रेनने रवाना झाले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे पक्षाच्या चिंतन शिबिरासाठी उदयपूरला जात असताना चित्तोडगड रेल्वे स्थानकावर कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले. राहुल गांधींव्यतिरिक्त, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, ज्येष्ठ नेते जयराम रमेश आणि इतर अनेक नेते आज पहाटे 5 वाजता ट्रेनने उदयपूरला पोहोचले. राहुल गांधी 15 मे रोजी शिबिराला संबोधित करणार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com