Goa Monsoon Update Dainik Gomantak
गोवा

Monsoon Update: नैऋत्य मोसमी पाऊस आज कर्नाटकात

गोव्यात 11 जूनपर्यंत मेघगर्जनेसह पाऊस बरसण्याची शक्यता वेधशाळेने वर्तविली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Monsoon Update एल निनो, बिपरजॉय चक्रीवादळ तसेच इतर काही कारणांमुळे आठवड्याभरानंतर गुरुवारी केरळात मॉन्सूनने हजेरी लावली आता मॉन्सून चांगली प्रगती करत असून येत्या 24 तासांत कर्नाटकात दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याद्वारे वर्तविण्यात आली आहे.

गोव्याच्या काही भागात 11 जूनपर्यंत मेघगर्जनेसह तुरळक पाऊस बरसण्याची शक्यता गोवा वेधशाळेने वर्तविली आहे. आज पणजी येथे कमाल 35.8 अंश सेल्सिअस, तर किमान 27.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे.

बिपरजॉय चक्रीवादळ सरकले

पूर्वमध्य अरबी समुद्रावरील घोंघावणारे बिपरजॉय चक्रीवादळ 60 कि.मी. प्रतितास वेगाने आज उत्तर-ईशान्य दिशेने सरकले. गोव्याच्या पश्चिमेस सुमारे 800 कि.मी. वर हे चक्रीवादळ घोंघावत आहे. येत्या 36 तासांत ते अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. येत्या दोन दिवसांत हे चक्रीवादळ पहिल्यांदा उत्तर-ईशान्य दिशेने आणि त्यानंतर उत्तर-वायव्य दिशेने सरकण्याची शक्यता आहे.

राज्यात अनेक ठिकाणी शिडकावा

गेल्या 24तासात राज्यात मॉन्सूपूर्व पावसाच्या काही भागात तुरळक सरी बरसल्या राजधानी पणजीत पहिल्यांदाच तुरळक पावसाच्या सरींचा शिडकाव झाला.

त्यासोबतच पणजी, माशेल, खांडोळा, सत्तरीतील होंडा, वाळपई, काणकोण, आगोंद, साकोर्डा, तांबडीसुर्ला आदी परिसरात पावसाचा शिडकावा झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT