Monsoon In Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Rains: रेकॉर्डब्रेकिंग पावसानंतर गोव्याला दिलासा मिळण्याची शक्यता

गोमन्तक डिजिटल टीम

Monsoon in Goa

पणजी: भारतीय हवामान खात्याने आज (सोमवार दि. 30 सप्टेंबर) रोजी राज्यात हलक्या ते माध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात वाढलेल्या पावसामुळे नागरिकांना दक्षता बाळगण्याचा इशारा देण्यात आला होता, मात्र हवामान खात्याच्या अंदाजानुसार राज्यात पुढील दोन दिवसांसाठी पावसाचा जोर आटोक्यात असण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यात सुरु असलेलं पावसाचं थैमान बऱ्यापैकी शांततेत थांबण्याची शक्यता आहे.

गेल्या आठवड्यात सप्टेंबर रोजी 92.1 मि.मी पावसाची नोंद झाली, त्यानंतर पुढील तीन दिवसांत 21.7 मि.मी, 15.2 मि.मी आणि 10.7 मि.मी पावसाची नोंद झाल्याने पाऊस बऱ्यापैकी आटोक्यात आल्याची संख्या उघड झाली होती.

काल रविवारी (दि. 29 सप्टेंबर) रोजी राज्यात सरासरी पाऊस फक्त 1.7 मि.मी होता आणि सर्व तालुक्यांच्या तुलनेत पेडण्यात सर्वाधिक म्हणजेच 10.4 मिमी पावसाची नोंद झाली. हवामान खात्याच्या अंदाजे आज राज्यात सकाळपासून धुकं असण्याची शक्यता आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar Case: सुभाष वेलिंगकरांना मोठा झटका! कोर्टाने फेटाळला सशर्त अटकपूर्व जामीन

Goa Rain: गोव्याला परतीच्या पावसाचा दणका; सत्तरी, डिचोलीत बत्ती गुल!

St. Francis Xavier DNA Test Row: ''वेलिंगकरांना अटक केल्यास...''; हिंदू संघटनांचा इशारा

Mount Kailash Mystery: '...पण माणूस रहस्यमयी कैलास पर्वतावर चढाई करु शकला नाही'!

Israel-Iran War Impact: तणाव इराण-इस्त्रायलमध्ये, झळ भारताला; तेलाच्या सर्वात मोठ्या आयातदाराची वाढली चिंता!

SCROLL FOR NEXT