Monsoon in Goa  Gomantak Digital Team
गोवा

Monsoon In Goa: केरळमध्ये मॉन्सून दाखल; आता गोव्यात 'या' दिवशी येणार

बिपरजॉय चक्रीवादळ सरकले उत्तर-वायव्येकडे

Akshay Nirmale

Monsoon In Goa: अनेक दिवसांपासून बहुप्रतीक्षेत असलेला मॉन्सून अखेर आज केरळात दाखल झाला. तब्बल आठ दिवस उशिरा दाखल झालेल्या मॉन्सूनने पहिल्याच दिवशी केरळातील बहुतांश जिल्हे कव्हर करत कर्नाटकचा शेजार गाठला आहे.

मॉन्सूनची ही स्थिती पाहता राज्यात 12 किंवा 13 जूनला मॉन्सून दाखल होईल, अशी शक्यता हवामान खात्याच्या वेधशाळेने व्यक्त केली आहे.

हवामान खात्याने जाहीर केलेल्या माहितीनुसार, नैऋत्य मॉन्सूनने दक्षिण अरबी समुद्राच्या उर्वरित भाग, मध्य अरबी समुद्राचा काही भाग, संपूर्ण लक्षद्वीप परिसर, केरळचा बहुतांश भाग, दक्षिण तामिळनाडूचा बहुतांश भाग, कोमोरिन क्षेत्राचा उर्वरित भाग, मन्नारच्या आखातीचा भाग व्यापला आहे.
मॉन्सूनची वाटचाल गतिमान होण्यासाठीची अनुकूल स्थिती असल्याने पूर्व भागात नैऋत्य, मध्य आणि ईशान्य बंगालचा उपसागर, मध्य अरबी समुद्र, केरळचा उर्वरित भाग, तामिळनाडू, कर्नाटकच्या काही भागात मॉन्सून सक्रिय होण्याची शक्यताही हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

सर्व मापदंड अनुकूल राहिल्यास मॉन्सूनचा वेग वाढेल आणि मॉन्सून येत्या चार - पाच दिवसांत गोव्यात दाखल होईल अशी शक्यता आहे.

बिपरजॉय चक्रीवादळ उत्तर-वायव्यकडे
पूर्वमध्य अरबी समुद्रावरील अत्यंत तीव्र चक्रीवादळ “बिपरजॉय” गेल्या 6 तासांमध्ये 5 कि.मी. प्रतितास वेगाने उत्तरेकडे सरकत आहे. हे वादळ गोव्याच्या पश्चिम-नैऋत्येस सुमारे 850 कि.मी., मुंबईच्या नैऋत्येस 900 कि.मी., पोरबंदरच्या 930 कि.मी. दक्षिण-नैऋत्येस आणि कराचीच्या दक्षिणेस 1220 कि.मी. लांब समुद्रात आहे.

पुढील 24 तासांत ते हळूहळू आणखी तीव्र होईल आणि पुढील तीन दिवसांत उत्तर-वायव्य दिशेने सरकेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे. या चक्रीवादळाचा राज्यात फारसा परिणाम होणार नसला तरी समुद्र खवळलेला राहणार आहे.

लाटांची उंची वाढलेली असेल. यामुळे मासेमारीसाठी मच्छीमाऱ्यांनी समुद्रात जाऊ नये असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kumar Kushagra Century: भारतीय फलंदाजीचा नवा हुकमी एक्का! 21 वर्षाच्या पोरानं ठोकलं शानदार शतक, कांगांरुची काढली पिसं; सिलेक्टर्सचं वेधलं लक्ष

श्रीलंकन कोर्टाचा मोठा निकाल! ईस्टर साखळी बॉम्बस्फोटातील 15 दोषींना सुनावली प्रत्येकी 220 वर्षांची शिक्षा; 11 भारतीयांसह 270 बळींना न्याय

Ranji Trophy: गोव्याचा स्वप्नील अस्नोडकर आता केरळचा मुख्य प्रशिक्षक! रणजीसह वनडे-टी-20 संघाचीही जबाबदारी; 2026-27मोसमासाठी मोठी संधी

Vagator Turtle Protection: वागातोर किनाऱ्यावर कासवांची 24 तास निगराणी! ऑलिव्ह रिडलेच्या अंड्यांच्या संरक्षणासाठी वन विभागाची कडक गस्त

Goa Building Rule: गोव्यात अवघ्या 3 मीटर रस्त्यावर बांधकामांना परवानगी? 2023च्या सुधारित नियमांना न्यायालयात आव्हान; सरकारला नोटीस

SCROLL FOR NEXT