Bicholim  Dainik Gomantak
गोवा

Bicholim News : डिचोली सम्राट क्लबतर्फे एकपात्री अभिनय स्पर्धा

Bicholim News : या स्पर्धेत लक्ष्मीबाई संझगिरी शाळेची नंदिका अरविंद नाईक हिने प्रथम क्रमांकाचे बक्षीस पटकावले.

गोमन्तक डिजिटल टीम

Bicholim News : डिचोली सम्राट क्लबतर्फे प्राथमिक विद्यार्थ्यांसाठी आयोजित कोकणी एकपात्री अभिनय स्पर्धा उत्साहात पार पडली. या स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला होता. सात प्राथमिक शाळातील मिळून २१ स्पर्धकांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता.

येथील अवरलेडी ऑफ ग्रेस हायस्कूलच्या सहकार्याने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.या स्पर्धेत लक्ष्मीबाई संझगिरी शाळेची नंदिका अरविंद नाईक हिने प्रथम क्रमांकाचे बक्षीस पटकावले.

शांतादुर्गा प्राथमिक शाळेच्या ओम प्रकाश नाईक गोवेकर याला द्वितीय, अवरलेडी शाळेच्या सार्थक सिद्धेश पालव याला तृतीय तर केवा सुधीर च्यारी हिला उत्तेजनार्थ बक्षीस प्राप्त झाले. सम्राट क्लबचे अध्यक्ष राहुल कवळेकर, सचिव यदुनाथ शिरोडकर, खजिनदार गोपाळ मोरजकर तसेच अवरलेडी हायस्कुलच्या मुख्याध्यापिका आणि शिक्षकवर्गाच्या उपस्थितीत विजेत्यांना बक्षिसे वितरित करण्यात आली.

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ आणि वाव मिळावा, यासाठी सम्राट क्लबकडून वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येतात. असे राहुल कवळेकर यांनी सांगितले. यदुनाथ शिरोडकर यांनी सूत्रसंचालन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vinorda Theft: दरवाजा तोडला, दागिने-रोकड लंपास; दिवसाढवळ्या घरफोडीमुळे विर्नोड्यात खळबळ

Goa: शेतकऱ्यांसाठी दिलासा! ‘हजारी केळी’ बनली बागायतदारांसाठी ‘ढाल’; खेतींपासून होतोय बचाव

Goa Politics: खरी कुजबुज; भाऊ, किती खड्डे बुजविले?

Tuyem Hospital: ..अन्यथा डिसेंबरमध्ये आंदोलन! तुयेतील हॉस्पिटल लवकर सुरू करण्याची मागणी; 8 वर्षे रखडले लोकार्पण

Ambavali Eco Tourism: आंबावलीत 1.04 लाख चौमी.जमिनीवर ‘इको टुरिझम’ प्रकल्प! IPB ची तत्त्वतः मान्‍यता; सूचना मागवल्या

SCROLL FOR NEXT