मडगाव: दवर्ली येथील बंगल्यावर छापा टाकून शनिवारी जप्त केलेले ते सहा कोटी रुपये गोव्याबाहेरून आलेल्या एका राजकीय पक्षाच्या उमेदवारांना देण्यासाठी हवाला मार्गाने आणल्याचा दाट संशय व्यक्त केला जात आहे. सध्या आयकर खाते या पैशांच्या मूळ स्रोतापर्यंत जाण्याचा प्रयत्न करत आहे. (Goa Latest News)
या बंगल्यात आणि एका गाडीमध्ये हे पैसे लपवून ठेवले होते. या प्रकरणात अभय पटेल या मारवाडी हवाला ऑपरेटरची चौकशी सध्या सुरू आहे.
‘ते’ फोन क्रमांक कोणाचे?
हा ऑपरेटर आके येथून पैशांचा कारभार चालवत होता. ज्या बंगल्यावर शनिवारी छापा टाकला, तो फातोर्डा येथील ए. वाझ यांच्या मालकीचा असून अभय पटेल याने तो भाड्याने घेतला आहे. एका गोव्याबाहेरील राजकीय पक्षाने हा व्यवहार केला होता. अभय पटेल याच्याकडून आयकर खात्याला (Income Tax Department) अनेक फोन नंबर मिळाले असून या दिवसांत तो कोणाकोणाच्या संपर्कात होता, त्याचा उलगडा होणार आहे.
कसिनोतही हवालाचा पैसा
गोव्यात (Goa) तीन व्यवसायांत हवालामार्गे पैसा येत असून त्यात कसिनोसाठी पैसा येतो. गोव्यात कसिनोत जुगार खेळण्यासाठी दिल्ली आणि गुजरात (Gujarat) येथून जे जुगारी येतात, ते विमानातून मोठी रक्कम घेऊन येऊ शकत नसल्याने ते हवाला मार्गाने पैशांचा व्यवहार करतात. गोव्यातील बांधकाम व्यवसायातही हवालामार्फत पैसा फिरत असून राजकीय कारणासाठीही या मार्गाचा वापर केला जातो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.