Indian Super League
Indian Super League Dainik Gomantak
गोवा

Indian Super League: मोहन बागान ‘लीग विनर्स शिल्ड’चा मानकरी; निर्णायक लढतीत मुंबई सिटी एफसीचा पराभव

किशोर पेटकर

Indian Super League: मोहन बागान सुपर जायंट्सने निर्णायक लढतीत मुंबई सिटी एफसीवर 2-1 फरकाने मात करुन इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत ‘लीग विनर्स शिल्ड’चा मान मिळवला. रंगतदार सामना सोमवारी कोलकत्यातील विवेकानंद युवा भारती क्रीडांगणावर झाला. पराभवामुळे मुंबई सिटीला तिसऱ्यांदा शिल्ड जिंकणे शक्य झाले नाही. त्यांना दुसरा क्रमांक मिळाला. तिसऱ्या स्थानी राहिल्यामुळे एफसी गोवास प्ले-ऑफ बाद फेरीत खेळावे लागेल.

दरम्यान, साखळी फेरीत सर्वाधिक 48 गुण नोंदवल्यामुळे मोहन बागान अव्वल ठरला, तर 47 गुणांसह मुंबई सिटी संघ द्वितीय स्थानी राहिला. हे दोन्ही संघ थेट उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले. एफसी गोवा (45 गुण), ओडिशा एफसी (39 गुण), केरळा ब्लास्टर्स (33 गुण), चेन्नईयीन एफसी (27 गुण) हे चार संघ प्ले-ऑफ बाद फेरीत खेळतील आणि त्यांच्यातील विजेता संघ उपांत्य फेरीत खेळेल.

दुसरीकडे, मोहन बागानने सोमवारी मोठ्या संख्येने उपस्थित चाहत्यांसमोर 22 लढतीतील 15वा विजय नोंदवला. शिल्ड पटकावण्यासाठी मोहन बागानला विजय अत्यावश्यक होता, तर मुंबई सिटीसाठी बरोबरी पुरेशी होती. तिसऱ्या पराभवामुळे मुंबई सिटीचे 22 लढतीनंतर 47 गुण कायम राहिले. गोमंतकीय आक्रमक खेळाडू लिस्टन कुलासो याने 28व्या मिनिटास मोहन बागानला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर बदली खेळाडू जेसन कमिन्स 80व्या मिनिटास मोहन बागानची आघाडी 2-0 अशी मजबूत केली. 89व्या मिनिटास लाल्लियानझुआला छांगटे याने मुंबई सिटीची पिछाडी एका गोलने कमी केली. इंज्युरी टाईममध्ये प्रयत्न करुनही मुंबई सिटीस बरोबरी साधता आली नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vegetable Prices Update: राज्यात फळभाज्यांचे दर भडकले, लसूण 320 रुपये किलो; सर्वसामान्यांना महागाईचे चटके

Blue Origin Flight: ऐतिहासिक! राकेश शर्मानंतर गोपीचंद थोटाकुरा ठरले अंतराळात जाणारे दुसरे भारतीय

Holy Spirit Feast In Margao: होली स्पिरिट चर्चच्या फेस्ताची सुरवात; मडगाव पालिकेचे 35 लाख महसुलाचे लक्ष्य

Egg Prices Increased: गोव्यात मासळीपाठोपाठ आता बॉयलर अंड्यांचे भाव गगनाला भिडले; दरातील चढउतार सुरूच

Kushavati River: केपेतील ‘कुशावती’चे पाणी प्रदूषित; ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात!

SCROLL FOR NEXT