Mohammad Kaif Goa Trip Dainik Gomantak
गोवा

Mohammad Kaif In Goa: प्रसिद्ध क्रिकेटर महमद कैफ यांनी बाणावलीत घेतला मासेमारीचा अनुभव

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव, ता. १५ (खास प्रतिनिधी): सध्‍या गोव्‍यात सहलीसाठी आलेला प्रसिद्ध क्रिकेटर महमद कैफ याने काल सोमवारी ( दि. १४ ऑक्टोबर) सायंकाळी चक्‍क मासेमारीचा अनुभव आपल्‍या कुटुंबियांसह घेतला. महमद कैफ आणि त्‍याची पत्‍नी पूजा ही आपल्‍या सात वर्षीय मुलगी इव्‍हा हिच्‍याबरोबर गोव्‍यात आला होता. बाणावली येथील ताज एक्‍झाॅटिकामध्‍ये सध्‍या तो उतरला आहे.

काल सोमवारी ( दि. १४ ऑक्टोबर) सायंकाळी कैफ आपल्‍या कुटुंबियांसह बाणावली समुद्र किनार्‍यावर आला होता. त्‍याला वास्‍तविक जेटस्‌कीचा अनुभव घ्‍यायचा होता. मात्र सुर्यास्‍त झाल्‍यामुळे तिथे असलेल्‍या जलक्रीडा चालकांनी जेटस्‌की पाण्‍यात उतरविण्‍यास नकार दिला. त्‍यामुळे कैफ याच्‍या वाट्याला निराशा आली. मात्र त्‍याचवेळी तिथे काठावर असलेल्‍या पेले फर्नांडिस या सेलेब्रिटी मच्‍छीमाराने त्‍याला वेगळीच ऑफर दिली.

आम्ही मासेमारी करण्‍यासाठी समुद्रात उतरणार आहोत. तुम्‍ही आमच्‍याबरोबर येता का असे विचारल्‍यावर कैफने आनंदाने त्‍याला होकार दिला. आणि आपल्‍या कुटुंबियांसह तो पेलेच्‍या बाेटवर चढला.

मासेमार्‍यांबरोबर कैफ आणि त्‍याचे कुटुंबीय परत समुद्र किनार्‍यावर आले असता आजचा हा अनुभव आपल्‍यासाठी विलक्षण होता असं कैफ म्हणालाय. पारंपारिक मासेमारी कशी करतात हे आपल्‍याला माहित नव्‍हते. आज ( दि. १५ ऑक्टोबर) मी त्‍याचा प्रत्‍यक्ष अनुभव घेतला. मासेमार्‍यांचे हे विश्व आमच्‍या क्रिकेट विश्वापेक्षा अधिक रोमांचक आहे अशी प्रतिक्रिया कैफने व्‍यक्‍त केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa live Updates: आशिष नेहराच्या अडचणीत भर; आमदार, अधिकारी निवासस्थानी पोहोचले

World Food Day: अभिमान! 'गोवन' अन्नपदार्थांचा टपाल खात्याकडून गौरव

Subhash Velingkar: फ्रान्‍सिस झेवियरच्या कृपेने गोव्यात 250 वर्षे जगातील 'अत्यंत क्रूर' न्यायालय होते : वेलिंगकर

Cabinet Decision: ...तर घरमालकाला १० हजारांचा दंड; मंत्रिमंंडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय

Panaji Smart City: 'स्मार्ट' बससेवा हीच का? पणजीत 'शेड'ची उभारणी अजून नाहीच

SCROLL FOR NEXT