Goa Fisherman in Delhi: कौतुकास्पद! पेले यांच्यासह गोव्यातील तीन दांम्पत्यांना स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी दिल्लीत आमंत्रण

सरकारने अशाप्रकारची संधी दिल्याबद्दल मच्छिमार बांधवांनी सरकारचे आभार मानले आहेत.
Goa Pele Fisherman in Delhi for Independence Day 2023 Celebration
Goa Pele Fisherman in Delhi for Independence Day 2023 CelebrationDainik Gomantak

Goa Pele Fisherman in Delhi for Independence Day 2023 Celebration: दिल्ली स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी गोव्यातील चार मच्छिमार दाम्पत्यांना आमंत्रित करण्यात आले आहे.

15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावर पंतप्रधानांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनाच्या ध्वजारोहण कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमासाठी देशभरातून सुमारे 1,800 विशेष पाहुणे उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान, सरकारने अशाप्रकारची संधी दिल्याबद्दल मच्छिमार बांधवांनी सरकारचे आभार मानले आहेत.

Goa Pele Fisherman in Delhi for Independence Day 2023 Celebration
Spicejet Sale: मुंबई - गोवा विमानाचे तिकीट केवळ 1,515 रूपयांत; स्वातंत्र्य दिनानिमित्त स्पाइसजेटचा सेल

स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी गोव्यातून वसंत पेडणेकर आणि त्यांची पत्नी लक्ष्मी पेडणेकर, फ्रान्सिस्को फर्नांडिस आणि त्यांची पत्नी डॉ रेणूका फर्नांडिस, सॅबी फर्नांडीस आणि त्यांची पत्नी फिलोमेना वेरोनिका लॉरेन्सो आणि जेसिन्तो गुरियाओ आणि कॅसल गुरियाओ या चार मच्छिमार दाम्पत्यांना आमंत्रित करण्यात आले आहे.

फ्रान्सिस्को फर्नांडिस उर्फ पेले यांनी पारंपरिक मच्छिमारांना (रापणकार) सरकार देत असल्याबद्दल सन्मानाबद्दल आभार आणि आनंद व्यक्त केला.

तर त्यांची पत्नी डॉ. रेणूका फर्नांडिस यांनी "जो सोहळा आतापर्यंत केवळ दूरदर्शनवर अनुभवत होतो, तो प्रथमच प्रत्यक्षरित्या अनुभवायला मिळणार, याचा आनंद शब्दातीत आहे."

"पती बाणावली येथे मच्छिमारीचा व्यवसाय करतात. या व्यवसायाबद्दल आपल्याला सार्थ अभिमान" असल्याची प्रतिक्रिया डॉ. रेणूका फर्नांडिस यांनी दिली.

Goa Pele Fisherman in Delhi for Independence Day 2023 Celebration
Banastarim Bridge Accident: चालक परेश सावर्डेकरच्या पोलिस कस्टडीत वाढ; पुढील सुनावणी 16 ऑगस्टला

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांचे सॅबी फर्नाडिंस यांनी आभार मानले. मच्छिमारी आपला पिढीजात व्यवसाय असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यांच्या पत्नी फिलोमेना लॉरेन्सा यांनीही सरकारच्या आमंत्रणाबद्दल आभार मानले आहेत.

मच्छिमाराचे कुटुंब या नात्याने आम्हाला दिल्लीच्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याचे आमंत्रण दिल्याबद्दल सरकारचे आभारी आहोत, असे त्या म्हणाल्या. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com