गोवा

Mandovi Accident: 'मोहम्मदचा अपघात नव्हे घातपात', कुटुंबियांनी व्यक्त केला संशय

पोलिसांनी प्रकरणाचा सखोल तपास करावा अशी नातेवाईकांची मागणी

गोमन्तक डिजिटल टीम

मांडवी पुलावर (Mandovi Bridge) दुचाकीचा अपघात होऊन मांडवी नदीत पडलेल्या 21 वर्षीय युवकाचा आज (शुक्रवारी) सकाळी एका कॅसिनो जवळ मृतदेह सापडला. मोहम्मद आगा (वय 21, रा. भाटले) असे या युवकाचे नाव असून, दोन दिवसांपूर्वी त्याचा अपघात होऊन तो नदीत पडला. आगा याचा मृतदेह चिकित्सा करण्यासाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रूग्णालयात (Goa Medical College) पाठवला आहे. पण, मोहम्मद आगा यांच्या कुटुंबियांनी 'मोहम्मदचा अपघात नव्हे घातपात' केल्याचा संशय व्यक्त केला आहे.

मोहम्मद आगा याच्या वडीलांनी आरोप करताना असे म्हटले आहे की, त्यांच्या मुलाचा अपघात झाल्यानंतर अपहरण करण्यात आले, नंतर त्याचा खून करून मृतदेह नदीत फेकून दिला. मोहम्मद चार दिवस पाण्यात होता असे त्याचा मृतदेह पाहून वाटत नाही. त्याच्या शरिरावर रक्त दिसत असल्याचे मोहम्मदचे वडील म्हणाले. पोलिसांनी याप्रकरणाचा सखोल तपास करावा अशी मागणी मोहम्मद आगा याच्या नातेवाईकांनी केली आहे.

अपघातात मृत झालेल्या मोहम्मद आगा याचा शुक्रवारी सकाळी एका कॅसिनोच्या बोटीजवळ पोलिसांना सापडला. मोहम्मदजवळ एटीएम सापडल्यानंतर त्याच्या आईवडीलांना मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी बोलविण्यात आले. यावरून आता राजकारण देखील गोव्यात तापताना दिसत आहे. सोनाली फोगाट प्रकरणावरून हैद्राबाद पोलिसांनी गोवा पोलिसांवर असहकार्याचे आरोप केले आहेत. त्यानंतर आता आणखी एक प्रकरण समोर आले असल्याने विरोधकांनी गोवा सरकारला धारेवर धरले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT