MLA Rajesh Phaldesai Dainik Gomantak
गोवा

Khandola News : मोदींमुळेच अयोध्येत राममंदिराची स्वप्नपूर्ती : आमदार राजेश फळदेसाई

Khandola News कुंभारजुवेत हजारो महिलांच्या उपस्थितीत मेळावा

गोमन्तक डिजिटल टीम

Khandola News : खांडोळा, अयोध्येतील श्री राम मंदिराचे पाचशे वर्षांपासूनचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळेच सत्यात उतरले, असे मत गोवा पुनर्वसन मंडळाचे अध्यक्ष तथा कुंभारजुवेचे आमदार राजेश फळदेसाई यांनी व्यक्त केले.

कुंभारजुवा येथे हजारो महिलांच्या उपस्थितीत झालेल्या महिला मेळाव्यात ते रविवारी बोलत होते. महिलांच्या प्रगतीसाठी आणि मतदारसंघातील विकासकामांसाठी कटिबद्ध असल्याचेही आमदार फळदेसाई म्हणाले.

यावेळी सुलक्षणा सावंत, भारतीय महिला मोर्चा गोवाच्या अध्यक्ष आरती बांदोडकर, जुने गोवेच्या सरपंच मेधा पर्वतकर, सांत इस्तेव्हच्या सरपंच स्मिता सावंत, कुंभारजुवेच्या उपसरपंच विंदा जोशी, करमळीच्या उपसरपंच रेश्मा कोरगावकर, रिमा फळदेसाई आदी मान्यवर उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आम्हाला ५ दिवस दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले आहे. आपण आपल्या आजूबाजूच्या मंदिरांना भेट देऊया आणि देवतांचे दर्शन घेऊया,असे आवाहन फळदेसाई यांनी केले.

या कार्यक्रमासाठी आम्हाला मैदान दिल्याबद्दल मॉन्टफोर्ड ब्रदर्सचे आभार मानतो. या कार्यक्रमासाठी चार दिवसांपासून परिश्रम केल्याबद्दल टीमचे आभार मानतो, असे फळदेसाई म्हणाले.

कुंभारजुवे मतदारसंघातील आमदार फळदेसाई यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन उपस्थित सर्व महिलांनी आपापल्या जीवनात सर्वार्थाने स्वयंपूर्ण व्हावे. अयोध्येत श्री राम मंदिराची झालेली उभारणी हा सर्वांच्याच आनंदाचा क्षण आहे. महिलांनीही हा आनंदोत्सव उत्साहात साजरा करावा.

-सुलक्षणा सावंत, भाजप नेत्या

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'या दुःखद घटनेने मन हेलावले', हडफडे नाईटक्लब प्रकरणानंतर मालकाची पहिली प्रतिक्रिया; कोण आहे हा सौरभ लुथरा?

Goa Bus Stand: गुड न्यूज! गोव्यातील 'ही' बसस्थानके होणार चकाचक; जवळपास 400 कोटी खर्चून मिळणार अद्ययावत सुविधा

Serendipity Festival 2025: सेरेंडिपीटीत अवतरणार महाकाय नरकासुर! 5 वेगवेगळ्या ठिकाणी मिळणार पाहायला; संपूर्ण माहिती जाणून घ्या..

एकाच घरातील तिघी बहिणी, भाऊ आणि बॅचलर पार्टीसाठी आलेला 'इशाक'; हडफडे क्लब आगीमुळे एका क्षणात अनेक कुटुंबांवर शोककळा

Goa Live News:भाजप नेत्यांच्या चुलत भावांचा गोव्यात अवैध नाईट क्लब व्यवसायात सहभाग! – विजय सरदेसाईंचा थेट आरोप

SCROLL FOR NEXT