Modi-Marathi Exhibition Dainik Gomantak
गोवा

Modi-Marathi Exhibition: 'मोडी'चा पुरातन ठेवा, अनेक दस्तऐवज पाहण्यासाठी उपलब्ध

मोडी लिपीचा जवळपास 700 वर्षांचा इतिहास सांगितला जातो.

गोमन्तक डिजिटल टीम

Modi-Marathi Exhibition: मराठी भाषेची मोडी लिपी ही प्राचीन लिपी आहे. मध्ययुगीन महाराष्ट्रात शीघ्र लेखनासाठी या लिपीचा वापर झाला. पणजी येथील कला व सांस्कृतिक भवनात मोडी लिपीचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. सोमवारी समाजकल्याण आणि पुरातत्व मंत्री सुभाष फळदेसाई यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्धाटन झाले. या प्रदर्शनात नागरिकांना मोडी-मराठी भाषेतील प्राचीन दस्ताऐवज पाहता आणि वाचता येतील.

मोडी लिपीचा जवळपास 700 वर्षांचा इतिहास सांगितला जातो. छत्रपती शिवाजी महाराज यांनी मोडी लिपीचा वापर राजलिपी म्हणून केला होता.

प्रदर्शनात काय पाहाल?

मोडी-मराठी प्रदर्शनात मोडी लिपीमधील विविध जुने पत्रव्यवहार पाहता येतील. यामध्ये छत्रपती संभाजी महाराज दुसरे, महादजी शिंदे, संभाजी आंग्रे, माधवराव पेशवे, खेम सावंत भोसले सरदेसाई III यांनी विविध कालावधीत तत्कालीन पोर्तुगीज व्हाईसरॉय तसेच सचिव यांच्याशी केलेला मोडी लिपीतील पत्रव्यव्हार आणि त्यांचे मराठीतील भाषांतर पाहायला मिळेल.

जुनी संस्थाने, राजवट याकाळात गोव्यात राज्य करणाऱ्या पोर्तुगीजांशी असलेल्या राजकीय तसेच, व्यापारी संबधांचा या पत्रव्यवहारावरून अंदाज बांधता येतो.

लिप्यांतरकार गिरीश गुरूनाथ म्हावळंकर गोवा सरकारच्या पुराभिलेक विभागात कार्यरत आहेत. मोडीचे अभ्यासक असणारे म्हावळंकर म्हणाले, 'मोडी लिपी जपणे अत्यंत म्हत्वाचे आहे. याबाबत जनजागृती आणि लोकांपर्यंत त्याची योग्य माहिती पोहचवणे गरजेचे आहे. शीघ्र लेखनशैली असल्याने ही लिपी चटकन समजण्यासाठी अवघड आहे. तसेच, मोडी लिहित असताना स्वल्पविराम, पूर्णविराम किंवा व्याकरण नियमांचा जास्त वापर दिसत नाही. पण, काही आघात आणि सवयी यांचा सबंध जोडता येतो, त्यानंतर शब्दांचे आकलन सोपे होते.'

लिप्यांतरकार गिरीश गुरूनाथ म्हावळंकर

'सावंतवाडी संस्थानच्या इतिहासाची साधने' (खंड-1) हे पुस्तक देखील लिप्यांतरकार गिरीश गुरूनाथ म्हावळंकर यांनी लिहले असून, ते लोकांना खरेदीसाठी उपलब्ध आहे.

मोडी लिपी-मराठी दस्तऐवजांच्या प्रदर्शनात माधवराव पेशवे, इतर मराठे आणि महाराष्ट्र प्रांतातील संस्थानिकांनी पोर्तुगीज व्हाईसरॉय आणि इतर अधिकाऱ्यांना जमिनीचे वाद, शांतता राखणे, पोर्तुगीज आणि मराठे यांच्यातील संबंध या विषयांवर पाठविलेल्या विविध पत्रांचा समावेश आहे. हे प्रदर्शन 16 ऑक्टोबर 2022 पर्यंत खुले राहणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दोनवेळा घर कोसळले, मदत नाही फक्त आश्वासनं मिळाली; कोलवाळमधील 65 वर्षीय महिलेचा एकाकी संघर्ष

Disneyland In India: भारतात होणार ‘डिस्नेलँड’, 500 एकर परिसरातल्या थीम पार्कला ‘या’ राज्याने दिली मंजुरी

Crocodiles Viral Video: हा कसला वेडेपणा! चक्क मगरीला दुचाकीवर घेऊन प्रवास, व्हिडिओ पाहून म्हणाल, खतरनाक...

Viral Video: भर मैदानात घुसला 'बिनतिकीट' पाहुणा! कुत्र्याच्या एंट्रीनं खेळाडूंमध्ये घबराट, पाहा VIDEO

Goa News Live Updates: पर्ये मॅनेजमेंट कॉलेज जवळ रात्री चाकू हल्ला

SCROLL FOR NEXT