Goa Government: गोव्यातील प्रत्येक तालुक्यात उभारणार 'महसूल भवन'

Goa Government: फोंड्यातील जुन्या पडिक इमारती पाडून त्याजागी पहिले महसूल भवन उभारण्यात येईल.
Goa Government
Goa Government Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Government: राज्यातील सर्व तालुक्यात महसूल भवन (Revenue Building) उभारण्यासाठी आपण प्रयत्न करणार असून तिस्क-फोंड्यातील जुन्या पडिक इमारती पाडून त्याजागी पहिले महसूल भवन उभारण्यात येईल, अशी माहिती महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

मोन्सेरात यांनी काल फोंडा मतदारसंघातील आपल्या खात्याच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी पाहणी दौरा आयोजित केला होता, त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी कृषिमंत्री रवी नाईक, फोंड्याचे नगराध्यक्ष रितेश नाईक, नगरसेवक विश्‍वनाथ दळवी, आनंद नाईक, वीरेंद्र ढवळीकर तसेच अतिरिक्त जिल्हाधिकारी विशाल गावणेकर इतर सरकारी अधिकारी उपस्थित होते.

Goa Government
Goa Government: 163 दिव्यांग सरकारी कर्मचारी बढतीच्या प्रतीक्षेत

राज्यातील सर्व सरकारी खात्यांचा योग्य लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोचण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून कोणतीही कामे अडून राहू नये यासाठी प्राधान्य दिले जात आहे असे बाबूश मोन्सेरात म्हणाले. फोंड्यातील सर्व सरकारी कार्यालयातील कामकाजाबद्दल आपण समाधानी असून म्युटेशनच्या काही फाईल्स शिल्लक आहेत, त्या जलदगतीने हातावेगळ्या करण्यात येतील.

कृषिमंत्री नाईक यांनी फोंडावासीयांना चांगले ते देण्याचा सातत्याने प्रयत्न करण्यात येत असून नागरिकांच्या सोयीसाठी आवश्‍यक सुविधा उपलब्ध करण्यात येत आहेत. सर्व खात्यांच्या मंत्र्यांमार्फत या सुविधा लवकरच उपलब्ध होतील, अशी ग्वाही दिली. केरये - खांडेपार येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पालाही बाबूश मोन्सेरात व फोंडा पालिकेचे मंडळ व सरकारी अधिकाऱ्यांनी भेट देऊनपाहणी केली.

Goa Government
Goa LIC फायनान्सच्या मालमत्तांची किंमत दुप्पट घेऊन एकाची फसवणूक

मामलेदार कार्यालय पहिल्या मजल्यावर

तिस्क - फोंडा येथील सरकारी संकुलात तिसऱ्या मजल्यावर असलेले मामलेदार कार्यालय आता पहिल्या मजल्यावर आणण्यात येणार आहे. तिसऱ्या मजल्यावरील मामलेदार कार्यालयामुळे बऱ्याचदा ज्येष्ठ नागरिकांना अडचणीचे ठरत आहे. त्यामुळे हे कार्यालय पहिल्या मजल्यावर आणण्यात येणार आहे.

माहितीघर पुन्हा तिस्क येथे...

तिस्क - फोंडा येथील सरकारी संकुलात असलेले माहिती घर पुन्हा तिस्क येथे आणण्यात येणार आहे. हे माहितीघर कदंब बसस्थानकावर नेण्यात आले होते. मात्र, गरजवंतांना कदंब बसस्थानकावरून पुन्हा तिस्क - फोंडा येथील सरकारी संकुलात यावे लागत असल्याने पूर्वीप्रमाणेच हे माहितीघर ज्या ठिकाणी कार्यरत होते, तेथे तळमजल्यावरच कार्यरत करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com