Varad Mhardolkar Dainik Gomantak
गोवा

'खेलरत्नचे नामांतर करुन मोदी सरकार चुकीचा पायंडा पाडतंय'

नरेंद्र मोदी यांनी जगापुढे चुकीचा पायंडा घातला असल्याचा आरोप कॉग्रेसचे राज्यस्तरीय युवा अध्यक्ष वरद म्हार्दोळकर (Varad Mhardolkar) यांनी केला आहे.

दैनिक गोमन्तक

कॉग्रेस (Congress) हा ऐतिहासिक परंपरा असलेला पक्ष आहे या पक्षातील राष्ट्रीय नेत्यांनी  देशाच्या स्वातंत्र्यासाठी महत्त्वाचे योगदान दिलेले आहे, मात्र, राजीव गांधी  खेलरत्न पुरस्काराचे नामांतर करून नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी जगापुढे चुकीचा पायंडा घातला असल्याचा आरोप कॉग्रेसचे राज्यस्तरीय युवा अध्यक्ष वरद म्हार्दोळकर (Varad Mhardolkar) यांनी  केला आहे.

दरम्यान, येत्या विधानसभा निवडणुकीत कुठल्या पक्षांशी युती करायची हा निर्णय हायकमांड घेणार असल्याचे त्यांनी उपस्थित पत्रकारांना सांगितले.   शिवोली युथ समितीची नवीन कार्यकारिणी जाहिर केल्याऩतर म्हार्दोळकर हणजुणात बोलत होते. यावेळी  समितीच्या युवा अध्यक्षपदी अड. रोशन चोडणकर (Roshan Chodankar) यांची नियुक्ती करण्यात आली. 

व्यासपीठावर कॉग्रेसचे जेष्ठ नेते तसेच माजी मंत्री चंद्रकांत चोडणकर, महिला अध्यक्षा पार्वती नागवेंकर, सामाजिक कार्यकर्ते तथा कॉग्रेस नेते दत्ताराम पेडणेकर , सांतआंद्रे मतदार संघाचे अध्यक्ष साईश आरोलकर, जिल्हा अध्यक्ष  विवेक डिसिल्वा तसेच युवा कार्यकर्ते उपस्थित होते. माजी मंत्री चंद्रकांत चोडणकर यांनी कॉग्रेसच्या अनेकांनी जरी  स्वार्थासाठी  पक्षांतर केलेले असले तरी जनमानसाच्या ह्रुदयसिंहासनावर कॉग्रेस पक्षाचे स्थान अबाधित असल्याचे सांगितले.

दत्ताराम पेडणेकर यांनी कॉग्रेसला सत्तास्थानी आणण्यासाठी पुन्हां एकदां स्थानिक युवा कॉग्रेस, महिला कॉग्रेस तसेच वरिष्ठ नेतेमंडळींनी एकत्रित येण्याचे आवाहन केले. महिलांनी घरची कामें आणी जबाबदारी आवरत असतांनाच  सामाजिक जबाबदारीचे भान ठेवीत वेळोवेळी ज्वलंत विषयांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी  रस्त्यावर उतरण्याची तयारी ठेवण्याचे आवाहन केले.

कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष विवेक डिसील्वा यांनी नरेंद्र मोदी देशात हुकुमशाही व्रुत्तीने सरकार चालवत असल्याचा आरोप केला. खेलरत्न पुरस्काराचे नामांतर करण्यासाठी लोकांकडून सुचना मिळाल्याचा दावा करणार्या मोदींना पेट्रोल डिजेलचे भाव कमी करण्याच्या जनतेकडून सुचना मिळाल्या नाहीत काय ? असा खोचक सवाल त्यांनी उपस्थित केला.  यावेळी शिवोली युथ समितीचे नवनियुक्त अध्यक्ष अड. रोशन चोडणकर यांच्या अध्यक्षतेखाली चार उपाध्यक्ष तसेच आठ सरचिटणीस मिळून एकुण चौतीस सदस्यांची समिती जाहीर करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Calangute: दारुच्या नशेत टाईट पर्यटकाचा कळंगुटमध्ये राडा; नग्न होऊन रस्त्यात झोपला, टॅक्सीवर उभारला

Rashi Bhavishya 23 November 2024: नोकरीत बढतीची संधी अन् बेरोजगारांनाही दिलासा... 'या' दोन राशींच्या लोकांचा विशेष दिवस!

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

SCROLL FOR NEXT