Kanhaiya Kumar Dainik gomantak
गोवा

मोदी सरकार शिक्षण क्षेत्राला निधी देण्यात अपयशी; कन्हैया कुमार

भाजप नोकऱ्या विकत आहे, त्यामुळे पारदर्शकतेसाठी काँग्रेसचे सरकार सत्तेवर आणण्याची गरज आहे

दैनिक गोमन्तक

मडगाव : नरेंद्र मोदी सरकार योग्य धोरणे राबवण्यात आणि शैक्षणिक क्षेत्रासाठी अर्थसंकल्पातील योग्य वाटा देण्यात अपयशी ठरले आहे, असा आरोप काँग्रेसचे युवा नेते कन्हैया कुमार यानी शुक्रवारी केला. “शिक्षण क्षेत्र पुढे नेण्यासाठी अर्थसंकल्पाचा दहावा भाग शैक्षणिक क्षेत्रासाठी द्यायला पाहिजे. पण या सरकारने ते गांभीर्याने घेतलेले नाही.’’असे कन्हैया कुमार (Kanhaiya Kumar) म्हणाले.

मडगाव येथे काँग्रेसतर्फे आयोजित ‘युवा स्पंदन’ कार्यक्रमात ते बोलत होते. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना कन्हैया कुमार म्हणाले की, हे सरकार देशाला कुठे घेऊन जात आहे, याचे विद्यार्थी समाजाने आत्मपरीक्षण करावे.

विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, जीपीसीसी अध्यक्ष गिरीश चोडणकर, एनएसयूआयचे राष्ट्रीय अध्यक्ष नीरज कुंदन, एनएसयूआय गोवाचे प्रदेशाध्यक्ष नौशाद चौधरी आदीही संवाद सत्राला उपस्थित होते. गोव्यात झालेल्या पक्षांतराच्या मुद्द्याकडे विद्यार्थ्यांनी दुर्लक्ष करू नये आणि येत्या विधानसभा निवडणुकीत (Assembly Election) गद्दारांना घरी पाठवावे, असे ते म्हणाले. "पक्षांतर करणारे आमदार आपली लोकशाही कमकुवत करत आहेत आणि स्वार्थासाठी आमचे हक्क हिरावून घेत आहेत." असे ते म्हणाले.

ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी 8500 कोटींचे विमान आणि 16 कोटींचे वाहन खरेदी केले आहे. लोकशाहीचा पाया वाचवा, असे आवाहन त्यांनी केले. "ज्या पक्षाने भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला नाही, तो कधीही राष्ट्रहितासाठी काम करणार नाही, ह्याचे आम्ही सर्वांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. हे राष्ट्र त्यांच्या भांडवलदार मित्रांना विकण्याची त्यांची प्रवृत्ती आहे, ती आम्ही खोडून काढली पाहिजे.” असे कन्हैया कुमार म्हणाले.

एनएसयूआयचे राष्ट्रीय अध्यक्ष नीरज कुंदन म्हणाले की, भाजपची धोरणे विद्यार्थीविरोधी आहेत. “सरकार सर्व काही विकून खाजगीकरण करत आहे. बेरोजगारी आणि देशासमोरील सर्व समस्यांना भाजप जबाबदार आहे. “कोविड (covid) महामारीच्या काळात मोदी सरकारने विद्यार्थी समुदायाला एक रुपयाचाही दिलासा दिलेला नाही. विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यात ते अपयशी ठरले.’’ असे कुंदन म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, विद्यार्थी ऑनलाइन (Online) वर्गांना बसत असल्याने विद्यापीठांनी शुल्क कमी केले पाहिजे. “परंतु हा दिलासा देण्यातही सरकार अपयशी ठरले आहे. भाजप सरकारला विद्यार्थी वर्गाची नाही तर भांडवलदार मित्रांची जास्त काळजी आहे.” असे ते म्हणाले. काँग्रेसला पाठिंबा देऊन गोव्यात (goa) परिवर्तन घडवून आणण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. दिगंबर कामत म्हणाले की, भाजप सरकारने बेरोजगारी वाढवली असल्याने विधानसभा निवडणुकीत युवाशक्तीचा महत्वाची भुमिका आहे. त्यांनी बदल घडवून आणला पाहिजे.

“येथील युवक नोकरीच्या शोधात इतर राज्यांमध्ये आणि राष्ट्रांमध्ये स्थलांतर करत आहेत. असे होऊ नये. पण सरकार नोकऱ्या आणि रोजगार निर्माण करण्यात अपयशी ठरल्याने हे घडत आहे.” असे कामत म्हणाले. भाजप (BJP) नोकऱ्या विकत आहे, त्यामुळे पारदर्शकतेसाठी काँग्रेसचे (Congress) सरकार सत्तेवर आणण्याची गरज आहे. अनेक विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना कन्हैया कुमार यांनी समर्पक उत्तरे दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: गोवा पोलिस सतर्क, बेकायदेशीर दारु जप्त

Goa Crime: बनावट सही, स्टॅम्प वापरून वाढवली मालमत्तेची किंमत, कर्ज मिळवण्यासाठी तिघांचे कृत्य; अटकपूर्व जामिनावर 15 रोजी सुनावणी

Margao: मडगाव नागरी आरोग्य केंद्राचे नाईलाजाने स्थलांतर! इमारतीची परिस्थिती भीतीदायक; जिल्हा इस्पितळातून राहणार कार्यरत

Goa Land Dispute Case: जमिनीच्या वादातून खूनाचा प्रयत्न, पोलिसांकडून दोघांना अटक; वाचा नेमकं प्रकरण?

Goa Tourist: महाराष्ट्रातील पर्यटकांचा गोव्यात धुडगूस; भर रस्त्यात हाणामारी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT