Holi 2024 Dainik Gomantak
गोवा

Holi 2024 : गोव्याच्या विकासात मोदींनी भरले रंग! मुख्यमंत्री डॉ. सावंत

Holi 2024 : या रंगोत्सवात मुख्यमंत्र्यांच्या पत्नी सुलक्षणा सावंत, वडील पांडुरंग सावंत व शेजाऱ्यांनी सहभाग घेतला. सर्वांनी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांना रंग लावत होळीच्या शुभेच्छा दिल्या.

गोमन्तक डिजिटल टीम

Holi 2024 :

साखळी, हाऊसिंगबोर्ड-साखळी येथील आपल्या निवासस्थानी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आपले कुटुंबीय व शेजाऱ्यांसह होळी सणानिमित्त रंगोत्सव साजरी केली.

यावेळी त्यांनी समस्त गोवेकरांना होळीच्या शुभेच्छा देताना येणाऱ्या काळात सर्वांच्या आयुष्यात आनंदाचे रंग बहराचे, अशी सदिच्छा व्यक्त केली.

होळी हा रंगांचा उत्सव आहे. आपल्या जीवनातही विविध रंगांची आवश्यकता असते. तसेच गोवा राज्याच्या विकासात रंग भरण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. त्यांच्याच सहकार्याने गोव्याचा मोठा विकास होऊ शकला.

म्हणूनच येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत उत्तर व दक्षिण गोव्यातील दोन्ही जागा भाजपच जिंकणार, असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी व्यक्त केला.

या रंगोत्सवात मुख्यमंत्र्यांच्या पत्नी सुलक्षणा सावंत, वडील पांडुरंग सावंत व शेजाऱ्यांनी सहभाग घेतला. सर्वांनी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांना रंग लावत होळीच्या शुभेच्छा दिल्या. तसेच मुख्यमंत्र्यांनीही सर्वांना रंग लावत त्यांना शुभेच्छा दिल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

Goa News Live: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

SCROLL FOR NEXT