Mocha Cyclone Dainik Gomantak
गोवा

Bay of Bengal Cyclone Mocha: राज्यात ‘मोचा’चा प्रभाव, वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी

मडगाव, काणकोणात वादळी वाऱ्यासह वळवाचा पाऊस

गोमन्तक डिजिटल टीम

Mocha Cyclone बंगालच्या उपसागरात झालेल्या मोचा चक्रीवादळामुळे गोव्यात ढगाळ हवामानासह काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी अनुभवायला मिळाल्या.

उद्या बुधवारपासून मात्र हवामान काहीसे स्वच्छ होण्याची शक्यता हवामान खात्याच्या गोवा वेदशाळेने व्यक्त केले आहे. हवामान खात्याने 8 व 9 मे रोजी गोव्यात पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तविली होती.

त्यानुसार आज राज्याच्या अनेक भागात तुरळक पाऊस पडला, तर सासष्टी व काणकोण तालुक्यात वादळी वारा व विजांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस पडला.

मडगावात सकाळी पाऊस पडल्यामुळे संध्याकाळी रेनकोट घालून व छत्र्या घेऊनच नागरिक घराबाहेर पडल्याचे चित्र होते.

काणकोणच्या अंतर्गत भागात आज सकाळी मध्यम स्वरूपाच्या अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या, तर मध्य काणकोणात पावासाची रिपरिप झाली.

उत्तरेकडून आलेल्या पावसामुळे खोला, आगोंद व किनारी भागाबरोबरच गावडोंगरी, खोतिगाव, आमोणे या भागात मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्या. पैंगीण व लोलये पंचायत क्षेत्रात सकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास पावसाची रिपरिप सुरू झाली.

मडगावात एक तास पाऊस

मडगावात आज सकाळी सव्वाआठ वाजता वारा, गडगडाटासह पावसाचे आगमन झाले. अंदाजे एक तास जोरदार पाऊस झाला. त्यामुळे हवामानात थोडासा गारवा निर्माण झाला, पण साडेनऊ वाजल्यानंतर सूर्य काळ्या ढगांतून डोकावला व संध्याकाळ 4 वाजेपर्यंत कडक ऊन होते.

गावडोंगरीत रस्त्यांवर पाणी

गावडोंगरी, खोतिगावात रस्त्यावर पाणी साचले. सध्या कौलारू घर शाकारणीची कामे सुरू आहेत. अकस्मात आलेल्या अवकाळी पावसाने छप्पर उघडलेल्या काहींच्या घरात पावसाचे पाणी शिरले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदा एकदम दणक्यात! सरकारकडून महागाई भत्त्यात 'इतक्या' टक्क्यांची घसघशीत वाढ; मिळालं तगडं गिफ्ट

Kumar Kushagra Century: भारतीय फलंदाजीचा नवा हुकमी एक्का! 21 वर्षाच्या पोरानं ठोकलं शानदार शतक, कांगारुंची काढली पिसं; सिलेक्टर्सचं वेधलं लक्ष

श्रीलंकन कोर्टाचा मोठा निकाल! ईस्टर साखळी बॉम्बस्फोटातील 15 दोषींना सुनावली प्रत्येकी 220 वर्षांची शिक्षा; 11 भारतीयांसह 270 बळींना न्याय

Ranji Trophy: गोव्याचा स्वप्नील अस्नोडकर आता केरळचा मुख्य प्रशिक्षक! रणजीसह वनडे-टी-20 संघाचीही जबाबदारी; 2026-27मोसमासाठी मोठी संधी

Vagator Turtle Protection: वागातोर किनाऱ्यावर कासवांची 24 तास निगराणी! ऑलिव्ह रिडलेच्या अंड्यांच्या संरक्षणासाठी वन विभागाची कडक गस्त

SCROLL FOR NEXT