Drowning Dainik Gomantak
गोवा

Mobor Beach: समुद्र खवळला, मच्छीमार पाण्यात ओढला गेला; मोबोर किनाऱ्यावरील घटना, 'दृष्टी'च्या जीवरक्षकांनी वाचवले प्राण

Mobor Beach Rescue: घटनेवेळी सुमारे २० ते २५ मच्छीमार मोबोर किनाऱ्याजवळील खडकांवर पोहत होते. त्यापैकी एकजण समुद्राच्या प्रवाहामुळे नियंत्रण हरपून खोल समुद्रात ओढला गेला.

Sameer Panditrao

पणजी: मोबोर किनाऱ्यावर रविवारी (२२ जून) दुपारी घडलेल्या घटनेत, एक मच्छीमार समुद्रातील प्रबळ प्रवाहामुळे जवळपास १५० मीटर आत ओढला गेला होता. मात्र द्रीष्टी मरीनच्या जीवरक्षकांनी वेळेवर धाव घेत त्याचा जीव वाचविला.

घटनेवेळी सुमारे २० ते २५ मच्छीमार मोबोर किनाऱ्याजवळील खडकांवर पोहत होते. त्यापैकी एकजण समुद्राच्या प्रवाहामुळे नियंत्रण हरपून खोल समुद्रात ओढला गेला. त्याच्या सहकाऱ्यांनी तत्काळ मोबोर वॉच टॉवरवरील जीवरक्षक मेघा वेळीप यांच्याकडे मदतीची विनंती केली. दरम्यान, लगेच वेळीप यांनी तत्काळ टॉवरवरील पथकाला सतर्क केले.

या बचावकार्यासाठी मोबोर आणि कावेलोसी किनाऱ्यांवरून प्रत्येकी एक जेटस्की तातडीने पाण्यात उतरविण्यात आली. सुमारे १५० मीटर अंतरावर पाण्यात धडपडत असलेल्या मच्छीमाराला जीवरक्षकांनी पाहिले. जीवरक्षक लवू गांवकर यांनी आपल्या जेटस्कीवरून त्या मच्छीमाराला सुरक्षित मोबोर वॉच टॉवरवर आणले.

त्यानंतर, पीडित मच्छीमाराला श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे त्याला ''रिकव्हरी पोझिशन''मध्ये ठेवून प्राणवायू (ऑक्सिजन) दिला गेला. नंतर १०८ रुग्णवाहिकेच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्याला मडगाव येथील रुग्णालयात हलवण्यात आले. त्याची प्रकृती आता स्थिर असल्याचे द्रीष्टीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

समुद्रकिनाऱ्यावर पोहण्यास बंदी

सध्या मान्सून हंगाम सुरू असल्याने गोव्यातील सर्व समुद्रकिनारे पोहण्यासाठी बंद ठेवण्यात आले आहेत. अशा काळात समुद्रात उतरणे अत्यंत धोकादायक ठरू शकते, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT