Mobile Hospital centre started By kelashi 
गोवा

केळशीत फिरत्‍या सुश्रुषालयाची स्‍थापना, वृद्ध रुग्‍णांना घरपोच मिळणार वैद्यकीय सेवा

स्‍वयंसेवक रुग्‍णांच्‍या घरी जाऊन वैद्यकीय सेवा देणार

सुशांत कुंकळयेकर

Kelshi Panchayat: घरात एकटेच रहाणार्‍या वृद्धांना त्‍यांच्‍या घरपोच वैद्यकीय आणि सुश्रुषा सेवा प्राप्‍त व्‍हावी यासाठी केळशी ग्रामपंचायतीने दक्षिण गोवा जिल्‍हा इस्‍पितळाच्‍या सहाय्‍याने फिरत्‍या सुश्रुषा केंद्राची सुरुवात केली असून पंचायत पातळीवर सुरु होणार्‍या या पहिल्‍याच अशा प्रकल्‍पाला सिप्ला फाउंडेशनचे सहकार्य लाभले आहे.

केळशीचे सरपंच डिक्सन वाझ यांनी या फिरत्‍या केंद्राचे उद्‍घाटन केले. ज्‍या वृद्धांची देखभाल करण्‍यासाठी घरात कोणी नाही. तसेच इस्‍पितळात जाऊन उपचार करुन घेण्‍याची ज्‍यांना ऐपत नाही अशा वृद्धांसाठी ही सेवा अत्‍यंत मोलाची असून या सेवेअंतर्गत वैद्यकीय कर्मचारी आणि या उपक्रमातील स्‍वयंसेवक रुग्‍णांच्‍या घरी जाऊन त्‍यांना सेवा देणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

केळशी पंचायत क्षेत्रात अशा प्रकारच्‍या एकूण 45 रुग्‍णांची यादी तयार केली असल्‍याची माहिती त्‍यांनी दिली.

यावेळी सिप्ला फाऊंडेशनचे प्रतिनिधी आर्य देव या प्रकल्पाच्या शुभारंभाच्यावेळी उपस्थित होते आणि त्यांनी स्वयंसेवकांचा प्रतिसाद आणि पाठिंबा पाहून आनंद व्यक्त केला. प्रकल्पाच्‍या प्रकल्प संचालक डॉ. आयरा आल्मेदा यांनी डॉक्टर परिचारिकांची टीम सेवेसाठी दिली आहे.

यावेळी ज्या 45 रुग्णांची तपासणी केली. त्‍यांची पुढील महिन्यात तपासणी करुन पाठपुरावा केला जाईल असे डॉ. आल्‍मेदा यांनी सांगितले. या दिवसभराच्या कार्यक्रमात अनेक स्वयंसेवक आणि पंच सदस्यांनीही भाग घेतला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Vegetable Vendors: महिला भाजी विक्रेत्यांना मडगावात जागा उपलब्ध करणार; दिगंबर कामत

Navpancham Yog 2026: आर्थिक भरभराट अन् नोकरीत प्रमोशन! 4 राशींसाठी 'नवपंचम योग' ठरणार जॅकपॉट; करिअरला मिळणार रॉकेटसारखी गती

Goa Rooftop Solar Scheme: छतावर सोलर लावा अन् मिळवा 2.20 लाखांपर्यंत अनुदान; गोव्यात नवी योजना लागू

Goa Politics: जाहीर सभेसाठी आम्हाला सरकारने जागा नाकारली, खासगी जागेवर सभेचे आयोजन करावं लागलं; चोडणकरांचा आरोप

Military Dog Tyson: लष्कराचा श्वान ‘टायसन’ला शौर्यसन्मान, गोळी झाडल्यानंतरही दहशतवाद्यांवर केला होता हल्ला

SCROLL FOR NEXT