Goa Assembly session  Dainik Gomantak
गोवा

आमदार घेणार कामकाजाचे धडे !

कार्यशाळा : रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी आणि गोवा विधानसभेचा उपक्रम

दैनिक गोमन्तक

पणजी: विधानसभेतील आमदारांना विधानसभेच्या कामकाजाची माहिती व्हावी या उद्देशाने गोवा विधानसभा आणि पुण्याच्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्यावतीने आज सोमवार आणि मंगळवारी दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती विधानसभेचे सभापती रमेश तवडकर यांनी दिली आहे.

(MLAs will conduct training workshops)

सभापती तवडकर म्हणाले, या दोन दिवसीय कार्यशाळेचे उद्‌घाटन हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्या हस्ते होईल. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत उपस्थित राहतील. यावेळी विशेष अतिथी म्हणून विरोधी पक्षनेते मायकल लोबो, विधानसभा कामकाजमंत्री नीलेश काब्राल, सचिव नम्रता उलमन आणि प्रबोधिनीचे संचालक रवींद्र साठे उपस्थित असतील.

या कार्यशाळेला राज्यसभेचे माजी सचिव देश दीपक वर्मा, महाराष्ट्र विधानसभेचे माजी सचिव डॉ. अनंत काळसे, उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक, डॉ. हरिष शेट्टी, उत्तर प्रदेशचे सभापती सतीश महाना आदी मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.

किती आमदार उपस्थित राहणार?

गोवा विधानसभा आणि पुण्याच्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्यावतीने सर्वच आमदारांना प्रामुख्याने नव्या आमदारांकरीता दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले आहे. या कार्यशाळेला संघाच्या मुशीत तयार झालेले महत्वाचे नेते मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे या कार्यशाळेला विरोधी गटातील किती सदस्य हजर राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. उद्‌घाटन सत्रात हिमाचलचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर, तर दुसऱ्या दिवसाच्या सत्रात उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक मार्गदर्शन करणार आहेत. हे दोन्ही नेते संघाशी संबंधित आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT