Yuri Alemao Dainik Gomantak
गोवा

Cuncolim News: ..हे 'राष्ट्रीय' दर्जाचे मैदान असेल! कुंकळ्ळी फुटसाल मैदान पायाभरणीवेळी आलेमाव यांचे आश्वासन

Cuncolim Futsal Ground: युरी आलेमाव यांनी शुक्रवारी माड्डीकटो-कुंकळ्ळी येथे फुटसाल मैदानाच्या कामाची पायाभरणी केली आणि युवकांनी आपले क्रीडा कौशल्य विकसित करण्याचे आवाहन केले.

गोमन्तक डिजिटल टीम

Cuncolim Futsal Ground Yuri Alemao's Initiative

मडगाव: गोव्यात फुटसालची क्रेझ वाढत आहे. तरुणांनी मागणी केल्यानंतर मी या मैदानासाठी प्रस्ताव ठेवला. हे राष्ट्रीय दर्जाचे मैदान असेल, जिथे युवकांना त्यांची प्रतिभा दाखवण्यासाठी व्यासपीठ मिळेल, असे कुंकळ्ळीचे आमदार तथा विरोधी पक्षनेते युरी आलेमाव म्हणाले.

युरी आलेमाव यांनी शुक्रवारी माड्डीकटो-कुंकळ्ळी येथे फुटसाल मैदानाच्या कामाची पायाभरणी केली आणि युवकांनी आपले क्रीडा कौशल्य विकसित करण्याचे आवाहन केले. यावेळी कुंकळ्ळीचे नगराध्यक्ष लँड्री मास्कारेन्हस, नगरसेविक पोलिटा कार्नेरो, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण नाईक आदी उपस्थित होते.

माझे वडील, माजी मंत्री ज्योकीम आलेमाव यांनी येथे अनेक क्रीडा सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. आमच्याकडे कुंकळ्ळीमध्ये अनेक फुटबॉलपटू आहेत, ज्यांनी आमच्या मतदारसंघाचे नाव मोठे केले आहे, असे आलेमाव म्हणाले.

लँड्री मास्कारेन्हस यांनी युवकांमध्ये क्रीडा कौशल्य विकसित करण्यासाठी हा प्रकल्प हाती घेतल्याबद्दल आमदार युरी आलेमाव यांचे आभार मानले. पोलिटा कार्नेरो यांचेही यावेळी भाषण झाले.

तरुणांनी सुविधेचा लाभ घ्यावा

क्रीडा खात्याने युवकांना प्रोत्साहन देण्यासाठी पावले उचलावीत. मला विश्वास आहे की, हा प्रकल्प युवकांना क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन देईल आणि तरुणांच्या मनात सांघिक भावना व शिस्त निर्माण करेल. तरुणांनी सुविधेचा लाभ घ्यावा आणि क्रीडाभावना विकसित कराव्यात.

हे मैदान झाल्यानंतर त्याची देखभाल करण्याची जबाबदारी प्रत्येक व्यक्तीची असेल. मला आशा आहे की, आमचे युवक मैदानाचा चांगला उपयोग करतील. येत्या पाच महिन्यांत मैदानाचे काम पूर्ण होईल, असे युरी आलेमाव म्हणाले.

फुटबॉल खेळ हा प्रत्येक गोमंतकीयाच्या रक्तात आहे, त्यामुळे या खेळाला प्रोत्साहन देण्याची गरज आहे. राज्यात फुटबॉलचा दर्जा घसरत असल्याचे पाहून मला खूप वाईट वाटते. त्यामागील कारणे तपासणे आणि सुधारात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे, जेणेकरून आपल्या तरुणांना राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर संधी मिळेल.
युरी आलेमाव, विरोधी पक्षनेते

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Casino: मांडवी नदीत महाकाय कॅसिनो जहाज प्रवेशास स्थगिती कायम; सुनावणी 18 ऑगस्टपर्यंत तहकूब

Heavy Rain in Goa: बाणावली येथे घरावर झाड कोसळून एक जखमी, सासष्टीत ठिकठिकाणी झाडे पडण्याचे प्रकार; छपरासह साहित्याचे नुकसान

Ugvem Highway Landslide: उगवे महामार्गावर पुन्हा कोसळली दरड! आठवड्यातील तिसरी घटना; नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

मुरगाव बंदरातील धक्का क्रमांक 9चा फेरविकास अखेर रखडला, युद्धाचा फटका; 1,300 कोटींच्या निधीला केंद्राकडून नकार

Private Bus Service: मुसळधार पावसाचा फटका! गोव्यातून पुणे-मुंबईकडे जाणारी खासगी बससेवा विस्कळीत

SCROLL FOR NEXT