MLA Viresh Borkar Dainik Gomantak
गोवा

New Zuari Bridge : झुआरीवरील 'त्या' स्टॉल विरोधात पोलिसांत तक्रार; बड्या भाजप नेत्याचे नाव आले समोर

आमदार वीरेश बोरकर यांची आगाशी पोलिस स्थानकांत तक्रार

गोमन्तक डिजिटल टीम

झुआरी नदीवरील नवा केबल स्टेड पूल सामान्य नागरिकांना पाहण्याकरता तीन दिवस खुला करण्यात आला होता. यावेळी या पुलावर एका व्यक्तीने शीतपेये आणि खाद्यपदार्थांच्या विक्रीचा गाडा थाटला. या प्रकारावर आमदार वीरेश बोरकर यांनी अवाज उठवला आहे. या पुलावर गाडा थाटणाऱ्या व्यक्तीविरोधात आरजीचे आमदार वीरेश बोरकर यांनी आगशी पोलिस स्थानकात गुन्हा नोंदविण्यासाठी तक्रार दिली आहे. दरम्यान या प्रकरणात स्टॉल्सचालकाने एका बड्या भाजप नेत्याचं नाव घेतलंं आहे.

झुआरी नदीवरील नव्या पुलाचे गुरुवार आज २९ रोजी उद्घाटन होत आहे. तत्पूर्वी राज्य सरकारने हा पूल सामान्यांसाठी पाहण्याकरता तीन दिवस खुला केला होता. यादरम्यान या पुलावर शीतपेये आणि खाद्यपदार्थांच्या विक्रीचा गाडा उभारण्यात आला होता. त्यामुळे पुलावर मोठी गर्दी झाली होती. तसेच वाहतूक कोंडीचेही प्रकार घडले होते. या पुलावर कोणालाही स्टॉल घालण्यासाठी परवानगी नसताना राजू मौर्या या इसमाने बेकायदेशीरपणे फूड स्टॉल उभारल्याप्रकरणी सांत आंद्रेचे आमदार वीरेश बोरकर यांनी आगशी पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.

यासंबंधीची सर्वात पहिली बातमी गोमन्तक ने केली होती. यावर अनेकांनी रोष व्यक्त करत हे राजकारण्यांच्या वरदहस्ताने होत असल्याची टीका केली होती. तसेच याला परवानगी मिळाली कशी असे सवाल देखील गोमंतकीयांनी उपस्थित केले होताे. (संबंधित बातमीची लिंक खाली दीली आहे.)

याप्रकरणी स्टॉल उभारलेल्या राजू मोर्या याला विचारण्यात आला असता त्यासाठी या पुलाच्या प्रकल्पाचे प्रमुख डीबीएल तसेच माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर यांनी या स्टॉलसाठी परवानगी दिल्याचे उघड केले. आमदार विरेश बोरकर यांनी बेकायदा स्टॉल विरोधात आवाज उठविल्यानंतर लवकुश मौर्या व त्याचे काही साथादारांनी त्यांच्याशी हुज्जत घातली. काही जण त्यांच्या अंगावरही धावून गेले तसेच त्यांचा अपमानही केला असे तक्रारीत नमूद केले आहे. या सर्वांना अटक करण्याची मागणी आमदार बोरकर यांनी आगशी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

फुल पैसा वसूल! रोहित शेट्टी आणतोय 'Golmaal 5', गोव्यात होणार शूटिंगची सुरुवात; अजय देवगणनं दिलीये हिंट

Delhi Airport Technical Glitch: 800 फ्लाईट्सना विलंब, अनेक रद्द; दिल्ली विमानतळावर तांत्रिक अडचणीचा हजारो प्रवाशांना फटका

"तुझी मासिक पाळी संपली की सांग...": महिला क्रिकेटपटूचा सिलेक्टरवर लैंगिक अत्याचाराचा आरोप, क्रीडा विश्वात खळबळ

समुद्रकिनारी रंगला भव्य विवाह! तेजश्री प्रधानने गोव्याच्या किनाऱ्यावर केलं 'Destination Wedding' शूट

Goa Today's News Live: काणकोण बसस्थानकाजवळील रस्त्याची दुर्दशा, चालक हैराण

SCROLL FOR NEXT