Viresh Borkar Inspects Zuari Bridge : झुआरीवरील स्टॉल्सची विरेश बोरकरांकडून पोलखोल

भाजप नेत्याने स्टॉल्ससाठी परवानगी मिळवून दिल्याची स्टॉलधारकाची कबुली
Viresh Borkar Inspects Zuari Bridge
Viresh Borkar Inspects Zuari BridgeDainik Gomantak
Published on
Updated on

Viresh Borkar Inspects Zuari Bridge : पणजी-मडगाव मार्गावरील झुआरी पुलाजवळ मंगळवारी अभूतपूर्व वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. मुख्यमंत्र्यांनी नुकतीच झुआरी पुलाची पाहणी करुन उद्घाटन होईपर्यंत लोकांना सेल्फी काढण्यासाठी हा पूल खुला करत असल्याचं जाहीर केलं होतं. याचाच फायदा घेत मोठ्या प्रमाणात नागरिक झुआरीवर सेल्फीसाठी जमले होते. याचा फटका मात्र वाहतुकीला बसून मोठी वाहतूक कोंडी कुठ्ठाळी परिसरात पाहायला मिळाली. लागलीच रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्षाचे आमदार विरेश बोरकरांकडून झुआरीवरील स्टॉल्सची पोलखोल करण्यात आली आहे. यावेळी स्टॉल्सचालकाने एका बड्या भाजप नेत्याचं नाव घेतल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

पाहणीवेळी आमदार विरेश बोरकरांसोबत काही कार्यकर्तेही होते. विरेश बोरकरांनी वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरलेल्या सेल्फी स्पॉटलाही भेट दिली. यावेळी त्यांना झुआरी पुलावर काही खाद्यपदार्थांचे स्टॉलही थाटलेले दिसले. गेल्या 3-4 दिवसांपासून हे स्टॉल्स चर्चेचा विषय बनले आहेत. विरेश बोरकरांनी स्टॉलवर जात या स्टॉलधारकांना फैलावर घेतलं. तसंच कुणाच्या परवानगीने हे स्टॉल्स लावले अशी विचारणा केली. यावेळी एका स्टॉलचालकाने भाजपच्या एका बड्या नेत्याचं नाव घेतल्याने विरेश बोरकरांनी आपला मोर्चा या नेत्याकडे वळवला. विरेश बोरकर यांनी या संपूर्ण घटनेचं रिव्हॉल्युशनरी गोवन्स स्टाईल फेसबुक लाईव्हही केलं.

Viresh Borkar Inspects Zuari Bridge
Colvale Fire : वेल्डिंगच्या ठिणगीमुळे अग्नितांडव; कोलवाळ परिसरात स्क्रॅपयार्डला आग

राजू मौर्य असं या स्टॉलधारकाचं नाव असल्याचं त्याने विरेश बोरकरांना सांगितलं. यावर विरेश यांनी कुणाच्या परवानगीने स्टॉल लावल्याची विचारणा केली. स्टॉलचालकाने झुआरी प्रकल्पाच्या अधिकाऱ्याच्या परवानगीने स्टॉल लावल्याचं आमदार विरेश बोरकरांना सांगितलं. विरेश यांनी स्टॉलचालकाला अधिकाऱ्याला फोन लावण्यास सांगितलं. अधिकाऱ्याने आपणच परवानगी दिल्याचं मान्य केलं. मात्र यासाठी भाजप नेते सिद्धार्थ कुंकळ्ळीकर यांनी शिफारस केल्यामुळेच परवानगी दिल्याचंही स्पष्ट केलं. यानंतर विरेश यांनी अधिकाऱ्याला चांगलंच फैलावर घेत लोकांना याच कारणामुळे नाहक वाहतूक कोंडीचा सामना करावा लागल्याने संताप व्यक्त केला.

दुसरीकडे मंगळवारी झालेल्या अभूतपूर्व वाहतूक कोंडीनंतर झुआरी पुलावरील सेल्फीसाठी प्रवेश बंद करण्यात आला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com