Fatorda Old Market Inspection Dainik Gomantak
गोवा

Vijay Sardessai: सरदेसाईंनी केली जुन्या फातोर्डा बाजाराची पाहणी; सोबतच सरकारवर सोडले टीकास्त्र

Fatorda Old Market Inspection: फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी सहकाऱ्यांसमवेत फातोर्ड्यातील जुन्या बाजाराची पाहणी केली

Akshata Chhatre

Old Market Fatorda, Madgao

मडगाव: फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी आज (बुधवार. दि. ६ नोव्हेंबर) रोजी सहकाऱ्यांसमवेत फातोर्ड्यातील जुन्या बाजाराची पाहणी केली. या भागातून पुरासंबंधित अनेक तक्रारींची नोंद झाल्याने त्यांनी परिसराची पाहणी केली आणि आवश्यक पावलं उचलण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

फातोर्ड्यातील जुन्या बाजाराचे ऐतिहासिक महत्व जाणून घेत आम्ही लवकरच इथे पर्यटकांसाठी हेरिटेज वॉक सुरू करणार आहोत असेही ते म्हणालेत. लवकरच KTC ते कोलवा सर्कलचा रस्ता सुशोभित केला जाईल मात्र या कामासाठी पर्यटन खात्याकडून केवळ अल्प रक्कम दिली गेल्याची माहिती सरदेसाई यांनी दिली आहे.

या दरम्यान माध्यमांशी संवाद साधताना आमदार विजय सरदेसाई यांनी अनेक मुद्यांवर भाष्य केले. ते म्हणालेत की जमिनीचे दर वाढवून सरकारने उत्तर गोवा हा परप्रांतीयांना विकला आहे आणि यानंतर आता सरकार दक्षिण गोव्याच्या बाबतीत देखील हेच करेल.

गोव्यातील भाजप सरकारचे अनेक आमदार दलाल आहेत आणि दलालीच्या व्यवसायातून पैसे मिळवण्यासाठी सरकारकडून जमिनीच्या दरात वाढ करण्यात आली आहे. यामुळे सामान्य जनतेवर अन्याय होतोय असं म्हणत त्यांनी गोवा राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले.

सध्या गोव्यात पैसे देऊन सरकारी नोकरी मिळवण्याचे अनेक प्रकार उघडकीस येत आहेत आणि या संदर्भात ज्या सरकारी कर्मचाऱ्यांना नोकरीत मुदतवाढ दिली जाते, ते सरकारी नोकरी घोटाळा प्रकरणांमध्ये सामील असल्याचा दावा देखील आमदार विजय सरदेसाई यांनी केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: नागरी विमान वाहतूक मंत्र्यांचे 'दाबोळीत' स्वागत

Goa Waste Management: व्यवस्थापनाचा 'कचरा'! राजकीय इच्छाशक्तीचा अभाव

'Serendipity Arts Festival'मध्ये होणाऱ विशेष कार्यशाळा; पूर्ण माहिती जाणून घ्या इथे

Banking Fraud: खोटी कागदपत्रे बनवून बँकेची फसवणूक; 1 कोटी रुपये लंपास केल्याचा प्रकार उघडकीस

Goa Investment: गोव्यात 'Central Park'चा Mega Project! 10,000 कोटींची होणार गुंतवणूक

SCROLL FOR NEXT