BJP Membership Drive
पणजी: भाजपने राज्यात सुरू केलेल्या सदस्य नोंदणीला सर्वत्र कमी-जास्त प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. आत्तापर्यंत राज्यात ३ लाख ३२ हजार सदस्य नोंदणी झाली असून, येत्या १५ नोव्हेंबरपर्यंत ४ लाख सदस्य करण्याचे पक्षाचे लक्ष्य आहे. त्याशिवाय १ हजार ९०० सक्रिय सदस्य नोंदणी झाली असून, पणजीत विक्रमी १४ हजार सदस्य नोंद झाल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी दिली.
तानावडे यांनी सांगितले की, वाळपई सर्वात जास्त, तर पेडणेत सर्वात कमी सदस्य नोंदले गेले आहेत. १५ नोव्हेंबर पर्यंत ४ लाख सदस्य नोंदणी करण्याचे लक्ष्य पक्षाने ठेवले आहे.
वाळपई आणि पर्ये दोन्ही मतदारसंघ सदस्य नोंदणीत आघाडीवर असून, उत्तर गोव्यात साळगाव, कुंभारजुवे, कळंगुट, म्हापसा, थिवी, कळंगुट आणि शिवोलीत कमी सदस्य नोंदणी झाली आहे. त्याशिवाय दक्षिण गोव्यात वेळ्ळी, कुडचडे, नावेली या मतदारसंघात कमी सदस्य नोंदणी झाल्याचे आढळले आहे, असे त्यांनी नमूद केले.
राज्यातील २७ प्रमुख कार्यकर्ते महाराष्ट्रातील निवडणुकीत सक्रिय असल्याने त्यांच्या अनुपस्थितीचा परिणाम सदस्य नोंदणीवर झाला आहे. पणजीत विक्रमी १४ हजार पक्षसदस्य नोंदल्याचे तानावडे यांनी सांगितले.काँग्रेस तिकीटावर निवडून भाजपात आलेल्या आमदारांच्या मतदारसंघात नोंदणी कमी झाल्याचे दिसत असल्याने तेथे सदस्य वृद्धीसाठी भाजप काय उपाय करणार, ते पहावे लागेल.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.